उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

By सदानंद नाईक | Published: March 19, 2024 05:35 PM2024-03-19T17:35:25+5:302024-03-19T17:36:08+5:30

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका पेक्षा जास्त वेळा अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आले.

Ulhasnagar Municipal Corporation has deducted from the salary of the retired employees who have been given additional salary increment, it has been submitted to the Chief Minister | उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली कटोती, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

उल्हासनगर : अतिरिक्त वेतनवाढ दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मधून महापालिकेने कटोती सुरू केल्याने, त्यांना मानसिक धक्का बसला आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त वेतनवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांना मात्र दरमहा वेतनवाढ मिळत असल्याचे उघड झाले आहे.

उल्हासनगर महापालिकेने अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एका पेक्षा जास्त वेळा अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आले. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोष वेतनवाढ झाली. याबाबत तक्रारी झाल्यावर महापालिकेने चौकशी केली असता, अतिरिक्त वेतनवाढीत अटी-शर्तीचा भंग झाल्याचे उघड झाले. दरम्यान वरिष्ठ लिपिक तानाजी पतंगराव व उमेश ठाकूर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्त वेतनातून गेल्या ४५ महिन्यांपासून महापालिका कपात करीत आहे. तर महापालिका सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली जातनाही. अशी माहिती सेवानिवृत्त कर्मचारी उमेश ठाकूर यांनी दिली. त्यांनी दिलेली वेतनवाढ कपात करू नये, यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधीताकडे साकडे घातले आहे.

महापालिका कामकाजासंबंधी विविध प्रशिक्षण पूर्ण करून अतिरीक्त वेतनवाढ दिलेल्या ६५ कर्मचाऱ्या पैकी फक्त सेवानिवृत्त झालेल्या तानाजी पतंगराव व उमेश ठाकूर या दोन कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना, सुनावणी न देता निवृत्ती वेतनातून गेल्या ४५ महिन्या पासून बेकायदेशीररीत्या ४-४ वेतनवाढ कपात केल्या जात आहे. अशी माहिती या दोन कर्मचाऱ्यांना दिली. मात्र दुसरीकडे महापालिकेत कार्यरत असलेल्या ६३ अधिकारी, कर्मचारी यांना या अतिरिक्त वेतनवाढीचे लाभ दिले जात आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांना एक न्याय व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दुसरा न्याय कसा? असा प्रश्न सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महापालिका अधिकारी यांच्याकडे साकडे घालून न्याय देण्याची मागणी केली.

शासनाकडे मागितला अभिप्राय... उपायुक्त अशोक नाईकवाडे 

महापालिकेने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अतिरिक्त शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तब्बल ६५ कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अतिरिक्त वेतनवाढ दिली. मात्र वेतनवाढ देतांना अटी व शर्तीचा भंग झाल्याचे उघड झाल्यावर, याबाबत महापालिकेने शासनाकडे अभिप्राय मागविला आहे. शासनाने दिलेला अभिप्राय सकारात्मक आल्यास, अतिरिक्त वेतनवाढ दिली जाणार आहे. तर दुसरीकडे अतिरिक्त वेतनवाढीत कपात सुरू केलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्ववत पुन्हा अतिरिकवाढ दिली जाणार आहे.

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation has deducted from the salary of the retired employees who have been given additional salary increment, it has been submitted to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.