उल्हासनगर मनपा : अभ्यासिकेला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:34 AM2019-02-05T03:34:49+5:302019-02-05T03:35:00+5:30

डॉ. आंबेडकर अभ्यासिकेच्या तीन मजली इमारतीला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीची मागणी मनसेने केली

Ulhasnagar Municipal Corporation: Rs. 48 lakhs CCTV | उल्हासनगर मनपा : अभ्यासिकेला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही

उल्हासनगर मनपा : अभ्यासिकेला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : डॉ. आंबेडकर अभ्यासिकेच्या तीन मजली इमारतीला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या प्रस्तावाच्या सखोल चौकशीची मागणी मनसेने केली असून एका कॅमेऱ्याची किंमत ७५ हजार दाखवण्यात आली आहे. महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी या प्रकाराची माहिती घेणार असल्याचे सांगितले.

यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाºया तरुणांसाठी उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी पाच कोटींचा निधी खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे अभ्यासिका बांधली. येथे स्पर्धात्मक परीक्षेची पुुस्तके, संगणक, मार्गदर्शनवर्ग आदी सुखसुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी येथे येणाºया मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आणि नगरसेवक राजेश वधारिया यांनी स्थायी समिती सभेत आणला. मागील मंजूर दराप्रमाणे ११ जानेवारीच्या स्थायी समिती सभेत ६५ सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक मशीन, इंटरनेट आणि तीन वर्षे दुरुस्ती तसेच देखभालीच्या प्रस्तावाला सभेने मान्यता दिली आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या एकूण २८ शाळा इमारतींना १५ जुलै २०१७ रोजी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुविधा देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने मंजूर केला. यासाठी ४६ लाखांचा खर्च दाखवण्यात आला. त्याच धर्तीवर अभ्यासिकेत सीसीटीव्ही कॅमेºयांसह इंटरनेट आणि तीन वर्षे देखभाल आदीच्या प्रस्तावाला गेल्या स्थायी समिती सभेत मान्यता मिळाली. मात्र, केवळ तीन मजल्यांच्या अभ्यासिकेला तब्बल ४८ लाखांचे सीसीटीव्ही कॅमेरे लागणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

चौकशीची मागणी

महापालिका मुख्यालयात एकाच जागी दोनदोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. तेव्हापासून सीसीटीव्ही कॅमेरे आणि ठेकेदाराची चर्चा सुरू झाली. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या एकूण २८ शाळा इमारतींना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. तेव्हाही कॅमेºयांच्या वाढीव किमतीबद्दल उघडउघड चर्चा सुरू झाली. त्यानंतर, तीन मजल्यांच्या अभ्यासिकेला लावण्यात येणाºया ६५ सीसीटीव्ही कॅमेºयांची किंमत ४८ लाख असणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation: Rs. 48 lakhs CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.