उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ शाळेचे काम संथगतीने; ८ वर्ष उलटूनही शाळेचे काम पूर्ण होईना?

By सदानंद नाईक | Updated: February 17, 2025 16:58 IST2025-02-17T16:57:41+5:302025-02-17T16:58:56+5:30

खाजगी शाळेच्या क्षेत्रछायेत गिरवीतात मुले शैक्षणिक धडे

ulhasnagar municipal corporation school no 24 and 18 school work is slow even after 8 years the school work is not completed | उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ शाळेचे काम संथगतीने; ८ वर्ष उलटूनही शाळेचे काम पूर्ण होईना?

उल्हासनगर मनपा शाळा क्रं-२४ व १८ शाळेचे काम संथगतीने; ८ वर्ष उलटूनही शाळेचे काम पूर्ण होईना?

सदानंद नाईक, उल्हासनगर : पुनर्बांधणीच्या नावाखाली ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केलेल्या महापालिका शाळा क्रं-२४ व १८ च्या इमारतीचे काम संस्थेगतीने सुरु आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळेची घंटा वाजणार की नाही? असा प्रश्न समाजसेवक प्रा. प्रवीण माळवे यांनी महापालिका आयुक्ताना केला आहे.

उल्हासनगर महापालिका शाळेतील मुलांच्या संख्येत घट होत असताना, दुसरीकडे शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार उघड झाला. खेमानी येथील शाळा क्रं-२४ व १८ च्या पुनर्बंधणीच्या नावाखाली शाळा इमारत ८ वर्षांपूर्वी जमीनदोस्त केली. त्यामुळे शाळेतील हजारो मुलांना एका खाजगी शाळेच्या इमारतीच्या क्षेत्रछायाखाली शैक्षणिक धडे गिरविण्याची वेळ आली. मूळ शाळा व आता भरत असलेल्या शाळेचे अंतर मोठे असल्याने, अनेक गरीब व गरजू मुलांनी आर्थिक परिस्थिती अभावी शाळेला कायमचा रामराम ठोकला. असी चर्चा परिसरात आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून यावर्षी तरी शाळेची घंटा वाजणार का?. की दुसऱ्याच्या खाजगी शाळेच्या प्रांगणात शैक्षणिक धडे मुलांना गिरवावे लागणार. असी शंका समाजसेवक प्रा. प्रवीण माळवे यांनी व्यक्त केली. 

महापालिका शाळेची इमारत पूर्ण होऊन येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्यासाठी अनेकांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. सामाजिक संघटना व मुलांच्या पालकांनी शाळा सुरु होण्यासाठी अनेकदा आंदोलनही केली. अखेर डिसेंबर २०२३ मध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. इमारतीचे चार मजले बांधून झाले. मात्र यावर्षी शाळा सुरु करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. नवनियुक्त आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नुकतीच महापालिका शाळेचा दौरा करून कामात कसूर केल्या प्रकरणी एका शिक्षिकाला कारणे दाखवा नोटीस बजाविली. याशाळा इमारतीचा दौरा आयुक्तानी करून, शाळा सुरु करण्यावर भर द्यावा. असीही मागणी होत आहे.

Web Title: ulhasnagar municipal corporation school no 24 and 18 school work is slow even after 8 years the school work is not completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.