उल्हासनगरातील लोकांना महापालिकेचा झटका; पाणीपट्टी करात वाढ, ९८८.७२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By सदानंद नाईक | Updated: March 24, 2025 19:20 IST2025-03-24T19:19:53+5:302025-03-24T19:20:18+5:30

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

Ulhasnagar Municipal Corporation shock to the people; Increase in water tax, budget of Rs 988.72 crore presented | उल्हासनगरातील लोकांना महापालिकेचा झटका; पाणीपट्टी करात वाढ, ९८८.७२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

उल्हासनगरातील लोकांना महापालिकेचा झटका; पाणीपट्टी करात वाढ, ९८८.७२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

सदानंद नाईक 

 उल्हासनगर : पाणीपट्टी करात करवाढ केलेला २०२५-२६ चा ५४ लाख शिलकीसह ९८८. ७२ कोटींचा अर्थसंकल्प सोमवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सादर केला. यात ९८८ कोटी १८ लाख महसुली खर्च आणि ९८८ कोटी ७२ लाख भांडवली खर्चाचा समावेश आहे. स्मार्ट चौक, स्मार्ट रस्ते, स्मार्ट शाळा, स्मार्ट आरोग्य केंद्र, स्मार्ट पार्किंग यांच्यासह पशु वैधकीय दवाखाना, दिव्याग भवन आदी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. महापालिकेला मागील वर्षी अनुदानापोटी १६८.९५ कोटी अपेक्षित धरण्यात आले होते. यंदाच्या अर्थसंकल्पात २४६. ४५ कोटींची वाढ केली आहे.

उल्हासनगर महापालिका २०२४-२५ चे ९७७ कोटी ६४ लाखाचा मूळ अर्थसंकल्प सुधारीत करुन आरंभीच्या शिल्लकेसह २०२५-२६ च्या आरंभिच्या शिल्लकेसह ९८८. ७२ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पाणीपट्टी करवाढ दर्शविणारा काटकसरीचा अर्थसंकल्प, महुसली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न, पर्यावरणपूरक उपाययोजना, महापालिकेची नवीन इमारत, महापौर व आयुक्त निवास, गोलमैदान व बोटक्लब विकास, नवीन टावून हॉल, वाल्मिकीनगर, उल्हास नदी घाट, महापालिका शाळा बांधणी, दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना, प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता, महापालिका कारभार संगणकीकरण व कार्यक्षमतावर भर, पाणी स्रोत योजना, वृक्षगणना व वृक्षसंवर्धन आदी अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट ठरली आहेत. 

महापालिकेचे उत्पन्न 
आरंभीची शिल्लक ६८ लाख ८२ हजार 
मालमत्ता कर -१२०. ४१ कोटी,
 पाणीपट्टी कर - ७२. २५ कोटी
 एमआरटीपी अंतर्गत वसुली - ८२.१३ कोटी 
जीएसटी अनुदान - २८६. ५३ कोटी
 शासन अनुदान - २४६. ४५ कोटी
 इतर जमा उत्पन्न - ५९. ६५ कोटी
 असाधारण लेखे - ३०. १९ कोटी
 कर्ज - ५० कोटी
 असे एकूण ९८८.७२ कोटी उत्पन्न

 महापालिका खर्च 
वेतन, निवृत्ती व भत्ते - २२५.३४ कोटी 
शिक्षण - ५० कोटी
 एमआयडीसी -५१ कोटी 
कर्ज परत फेड - १३.३८ कोटी 
वीज आकार - १३ कोटी,
 अन्य महसुली खर्च -२३५.६८ कोटी, 
भांडवली खर्च - ३६९.५८ कोटी
 असाधारण लेखे - ३०. १९ कोटी
 अखेरची शिल्लक - ५४ लाख
 असे एकूण ९८८.१८ लाख खर्च

 ठळक वैशिष्ट्ये
 १) १०० टक्के नळजोडणीवर पाणी मिटर 
२) स्मार्ट रस्ते, शाळा, चौक पार्किंग दिव्यांग भवन, 
३) संगणीकीकारणावर भर, ऑनलाईन परवाने 
४) ऑडिओ लायबरी, पार्किंग व्यवस्था
 ५) पर्यवरण पूरक सौर ऊर्जा, इलक्ट्रॉकल बस आदिवर भर 
६) सामाजिक विभागाची निर्मिती
 ८) शहरात सांस्कृतिक भवन, महिला भवन

शहरातील विकास कामे
 एमएमआरडीएकडे शांतीनगर ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या उड्डाणपूलासाठी ५४४ कोटी तर शहरातील अन्य आठ रस्त्यांसाठी ९९ कोटीची मागणी करण्यात आलेली आहे.

अमृत योजना भुयारी गटार योजना- ४१६ कोटी 
अमृत योजना वाढीव पाणी पुरवठा योजना- ११६ कोटी 
मुलभूत सेवा योजना- ५० कोटी
 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना- १० कोटी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना- ५ कोटी 
भाजी मार्केट - ५ कोटी 
नवीन टाऊन हॉल- ५ कोटी 
संक्रमण शिबीर व एकात्मिक घनकचरा प्रकल्प

 समाज विकास विभागाची निर्मिती
 महानगरपालिकेमध्ये दूर्बल व वंचीत घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज विकास विभागाची निर्मीती केली जाणार असून या विभागाला पुरेसे मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. सामाजिक दृष्ट्यादूर्बल घटकांसाठीच्या कल्याणकारी योजना- ३५.३९ कोटी अल्पसंख्याकांसाठी विकास योजना    -१.५० कोटी 
तृतीय पंथीयांसाठीच्या विकास योजना    -५० लक्ष

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation shock to the people; Increase in water tax, budget of Rs 988.72 crore presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.