उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभा वादळी; काय झाला वाद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 05:53 PM2022-04-01T17:53:34+5:302022-04-01T17:53:42+5:30
सत्य साई प्लॅटिनियम खाजगी हॉस्पिटल भाडेतत्त्वावर घेण्याचा ठराव रद्द, दरमहा २३ लाख ६० हजार भाडे वाचले
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला देण्यावरून महापालिका प्रशासनासह शिवसेना व भाजपवर टीका होत असताना, स्थायी समिती सभेने ३१ मार्च रोजी सत्य साई प्लॅटिनियम रुग्णालय भाडेतत्त्वावर घेण्याचा ठराव रद्द केला. यामुळे महापालिकेचे दरमहा २३ लाख ६० हजार रुपये वाचले आहे.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, कोविडच्या पहिल्या लाटेत महापालिकेने राज्य शासनाचे शासकीय प्रस्तुतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रूपांतर केले. तसेच मध्यवर्ती रुग्णालय, रेडक्रॉस रुग्णालय यांच्यात सुविधा निर्माण करून आरोग्य केंद्र अद्यावत केली. मात्र दुसऱ्या कोविड लाटेचा सामना करण्यासाठी महापालिकेने चक्क खाजगी सत्य साई प्लॅटिनियंम रुग्णालय दरमहा २३ लाख ६० हजार रुपयाने सप्टेंबर २०२० साली भाडेतत्त्वावर घेतले. तेव्हा पासून महापालिकेचे रुग्णालयाच्या भाड्यावर कोट्यवधींचा खर्च केला. दरम्यान कोरोना रुग्णाची संख्या अत्यंत कमी झाली असून शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंधी उठविले.
महापालिकेने कोरोना सारख्या महामारीला सामोरे जाण्यासाठी स्वतःचे २०० बेडचे रुग्णलाय कॅम्प नं-१ मध्ये उभे केले. दरम्यान सत्य साई प्लॅटिनियम या खाजगी रुग्णालयाची भाडेतत्त्वावरील मुदत वाढविण्याचा ठराव ३१ मार्चला शेवटच्या स्थायी समिती सभेत आला. याला भाजप नगरसेवकांनी विरोध करून रद्द केला. शिवसेना पक्षाचे समिती सदस्यांनी मात्र ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्याच बरोबर खेमानी येथील ४० लाखाचा रस्ता प्रस्ताव रद्द केला. याशिवाय सुरक्षा रक्षक याना मुदत वाढ देणे, रमाबाई आंबेडकर रस्ता आदी प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. अशी माहिती स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांनी दिली आहे.