उल्हासनगर महापालिकेची बोगस डॉक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 04:16 PM2022-02-11T16:16:51+5:302022-02-11T16:17:01+5:30

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बोगस डॉक्टरवरील कारवाई थंडावली. अशी कबुली वैधकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली.

Ulhasnagar Municipal Corporation takes action against bogus doctor | उल्हासनगर महापालिकेची बोगस डॉक्टरवर कारवाई

उल्हासनगर महापालिकेची बोगस डॉक्टरवर कारवाई

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : मयत डॉक्टर नीरज रॉय यांच्या सोनी क्लिनिक मध्ये वैधकीय प्रमाणपत्र व परवाना नसतांना दवाखाना चालविणारा बोगस डॉक्टर निनाद रॉय यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुरवारी उशिरा गुन्हा दाखल झाला. महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केलीं असून बोगस डॉक्टरांची झाडाझडती सुरू असल्याची माहिती डॉ पगारे यांनी दिली. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ स्टेशन रोड वरील सोनी क्लिनिक मध्ये मयत डॉ नीरज रॉय यांच्या नावाने दवाखाना चालविणारा बोगस डॉ निनाद रॉय यांच्या विरोधात महापालिका वैधकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुरवारी उशिरा तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी निनाद रॉय या बोगस डॉक्टराला अटक केली. त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र व परवाना नसल्याचे तपासात उघड झाले. डॉक्टर नसतांना गोरगरीब नागरिकांची फसवणूक केली असून त्याच्या हातून काही गैरकृत्य झाले का? याचा तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत. कोणताही वैधकीय परवाना व महाराष्ट्र मेडिकल कोन्सिल मध्ये या बोगस डॉक्टरांची नोंद नसल्याची माहिती डॉ पगारे यांनी दिली. 

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून बोगस डॉक्टरवरील कारवाई थंडावली. अशी कबुली वैधकीय अधिकारी डॉ पगारे यांनी दिली. महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी गेल्या महिन्यात शहरातील बहुतांश क्लिनिक सेंटर, खाजगी रुग्णालय आदी ठिकाणच्या डॉक्टरांना नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना वैधकीय प्रमाणपत्र व परवाना महापालिका आरोग्य विभागात सादर करण्यास सांगितले. याप्रकारने वैधकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून झोपडपट्टी भागात थाटलेल्या बोगस दवाखान्यातील डॉक्टरांत भितीचे वातावरण पसरले. तत्कालीन वैधकीय अधिकारी डॉ राजा रिजवानी यांनी दोन वर्षांपूर्वी बोगस डॉक्टरांवर कारवाई करून एक वातावरण निर्मान झाले. नागरिकांनी आपल्या परिसरात बोगस डॉक्टर असेलतर त्याची माहिती देण्याचे आश्वासन आवाहन डॉ पगारे यांनी केले.

Web Title: Ulhasnagar Municipal Corporation takes action against bogus doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.