उल्हासनगर महापालिकेची अवैध होर्डिंगवर कारवाई, ४७ होर्डिंगला नोटिसा
By सदानंद नाईक | Published: May 21, 2024 07:08 PM2024-05-21T19:08:16+5:302024-05-21T19:08:56+5:30
अवैध होर्डिंग उभ्या करून लाखो रुपयांचे उत्पन्न घशात घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे.
उल्हासनगर : महापालिकेने मुंबई सारखी दुर्घटना टाळण्यासाठी अवैध ४७ जाहिरात होर्डिंगला नोटिसा देत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने मंगळवारी कारवाई सुरू केली. या कारवाईने, अवैध होर्डिंगधारकांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिकेने पवन, पंचशील, विंटेंज, किंग, मारुती व इतर अश्या ६ ठेकेदारांना एकून ६७ होर्डिंगला परवानगी दिल्या आहेत. त्यांनी होर्डिंगचे स्ट्रॅक्टरल ऑडिट केले. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येते. मुंबईमध्ये जाहिरात फलक पडून १८ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून तशी घटना टाळण्यासाठी महापालिकेने, एकून ४७ अवैध हिर्डिंगला नोटीसा दिल्या होत्या. नोटीसी नंतरही होर्डिंग काढले नसल्याने, महापालिका अतिक्रमण पथकाने अवैध होर्डिंगवर मंगळवार पासून कारवाई सुरू केली. वर्षानुवर्षे उभ्या राहिलेल्या हिर्डिगवर महापालिकेने कारवाई का केली नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अवैध होर्डिंग उभ्या करून लाखो रुपयांचे उत्पन्न घशात घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे. महापालिका अतिक्रमण पथकाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या टीमने कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावरील वेलकम गेट जवळ, शांतीनगर येथील विनापरवानगी लावण्यात आले अनधिकृत होर्डीग कापून हटविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश दिले असून एकून होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अवैध होर्डिंग लावून लाखो रुपये उत्पन्न कामविणार्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करून दंड ठोठाविण्याची मागणी होत आहे. तसेच अवैध होर्डिंग जमीनदोस्त करण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी दिला आहे.