उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभागाला झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2022 09:17 PM2022-04-01T21:17:15+5:302022-04-01T21:17:25+5:30
५१ कोटीचे उत्पन्न, विभागाचा नवीन विक्रम
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका नगररचनाकार पदी प्रकाश मुळे यांची नियुक्ती झाल्यावर विभागाला नवी झळाळी मिळाली असून त्यांनी विभागाला ५० कोटी ८२ लाखाचे उत्पन्न मिळून दिले. वर्षभरात त्यांनी एकून १२९ बांधकाम परवाने दिले असून बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया राबवून अनेकांना हक्काचे डी फार्म मिळून दिला.
उल्हासनगर महापालिका नगररचनाकार विभाग नेहमी वादात राहिला असून गेल्या काही वर्षांपासून विभागाकडून येणारे उत्पन्न जवळजवळ ठप्प झाले होते. मात्र सहा महिन्यापूर्वी नगररचनाकार म्हणून नियुक्त झालेले प्रकाश मुळे यांनी विभागाला नवी झळाळी दिली. त्यांनी एका वर्षात एकून १२९ नवीन बांधकाम परवानग्या दिल्या असून अनेक इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला. तसेच बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू करून अनेकांना हक्काचा डी फार्मचे वाटप महापौर लिलाबाई अशान व आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या हस्ते झाले.
यापूर्वी विभागाचे २० कोटी पेक्षा जास्त उत्पन्न झाले नाही. मात्र यावर्षी मुळे यांनी विभागाचे उत्पन्न ५० कोटी ८२ लाखा पेक्षा जास्त मिळवून दिले. यावर्षी नगररचनाकर विभागाची सर्वाधिक उत्पन्नाची नोंद झाली. अवैध बांधकाम नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास, उत्पन्नाचे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडुन टाकणार असल्याची प्रतिक्रिया मुळे यांनी दिली. आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव आदींनी नगररचनाकार प्रकाश मुळे यांच्या कामाचे कौतुक केले.