उल्हासनगर महापालिकेच्या ८२१ कोटींच्या अंदाजपत्रकात मंजुरी, करवाढ नाही, नागरिकांचा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:00 PM2020-09-11T19:00:51+5:302020-09-11T19:14:12+5:30
उल्हासनगर महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले सन २०२०-२१ चे वार्षिक ७७०.७६ कोटीचे अंदाजपत्रक महासभेत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सादर केला.
उल्हासनगर : महापालिका महासभेने सन २०२०-२१ चा ८२१.२६ कोटीच्या ९ लाख शिल्लकी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. कोणतेही दरवाढ न सुचाविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून पालिकेचे अंदाजपत्रक म्हणजे मुंगेरेलाल के हसीन सपने अशी टीका विरोधी पक्षांसह मनसेने केली.
उल्हासनगर महापालिका स्थायी समितीने मंजूर केलेले सन २०२०-२१ चे वार्षिक ७७०.७६ कोटीचे अंदाजपत्रक महासभेत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सादर केला. स्थायी समिती एकसभापती राजेश वधारिया यांचा सभापती पदाचा कालावधी दोन दिवसा पूर्वी संपल्याने महापालिका इतिहासात प्रथमच अंदाजपत्रक सादर करण्याची वेळ आयुक्तांवर आली. आयुक्तांनी ७७०.७६ कोटीचे आंदाजपत्रक मांडल्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यामध्ये अनेक दुरस्त्या सुचविल्या. अखेर सर्वानुमते ८२१.२६ कोटींचे उत्पन्न तर ८२१. १७ कोटी खर्च अश्या ९ लाख शिल्लकी बजेटला मंजुरी देण्यात आली. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांना प्रत्येकी २ कोटीचा तर स्थायी समिती सदस्यांना ५० लाख व विशेष समिती व प्रभाग समिती सदस्य यांना प्रत्येकी २५ लाखाचा निधी देण्यात आला आहे.
स्वच्छ व सुंदर उल्हासनगर साठी खेमानी नाला विकासासाठी ५ कोटी, डॉ आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी, महापालिकेचे स्वतःचे १०० खाटाच्या रुग्णालयासाठी ५ कोटी, कचरा प्रकल्पासाठी १० कोटी, पत्रकार भवन साठी १ कोटी, विश्रामगृह साठी - २ कोटी, नवीन महाविद्यालय बनविण्यासाठी ६ कोटी, दिझेल दाहिणी १ कोटी, संत रोहिदास भवन साठी १ कोटीचा निधी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास साठी १ कोटी, रात्र निवाऱ्यासाठी ६० लाख रुपयाची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टी कराची वसुली, बांधकाम नियमित करणे, शासन अनुदान आदी मधून ८२७.२० लाखाचे उत्पन्न तर ८२१.१७ कोटीचा खर्च असे ९ लाख शिल्लकीचा अंदाज व्यक्त केला आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक म्हणजे मुंगेरीलालचे स्वप्नं
महापालिका स्थायी समिती सभापती राजेश वधरिया, भाजपचे शहराध्यक्ष जमनु दास पुरस्वानी, मनोज लासी, प्रदीप रामचंद नानी, मनसेचे बंडू देशमुख आदींनी महापालिकेचे अंदाजपत्रक म्हणजे मुंगेरिलाल यांचे हसीन स्वप्न अशी टीका होती.