उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांचे पादुका जोडो आंदोलन
By सदानंद नाईक | Published: December 2, 2022 07:07 PM2022-12-02T19:07:51+5:302022-12-02T19:09:06+5:30
उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांनी पादुका जोडो आंदोलन केले.
उल्हासनगर : कामगारांचा वेळेत पगार काढणे, रखडलेली पदोन्नती मार्गी लावणे, सुट्टीच्या दिवशी कामगारांना कामाला बोलावणे, घरभाडे कमी आकाराने आदी मागणीसाठी शुक्रवारी दुपारी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी कामगारांसह पादुका जोडो आंदोलन केले. उल्हासनगर महापालिका आर्थिक डबघाईला आली असून वर्षातील ८ महिन्यात मालमत्ता कर वसुली समाधानकारक नाही. शुक्रवारी दुपारी ३ वाजता कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आयुक्तांचे लक्ष आकर्षीत करण्यासाठी पादुका झोडो आंदोलन केले.
कामगारांचे पगार तात्काळ करावे, कामगार वसाहतीतले भाडे कमी करावे, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सफाई कामगारांचे खाडे करू नये, व कामावर येण्यास कोणालाही जबरदस्ती करू नये, सातव्या वेतनची थकबाकी लवकरात लवकर मिळावी, वारसाचे प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली लागावी, अनुकंपतत्वावरील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात यावी, २५ सेवा झाली त्यांना घरे मोफत मिळावी, मुकादम यांच्या ऑर्डर तात्काळ काढण्यात यावे, आदी मागण्यासाठी कामगार नेते राधाकृष्ण साठे साहेब यांनी पादुका जोडो आंदोलन केले.
महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांच्यासह कामगारा सोबत चर्चा करून वेळेत पगाराचे आश्वासन दिले. तसेच इतर मागण्या लवकरच निकाली काढण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार असल्याचे सांगितले. साठे यांनी आंदोलन मागे घेत मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी केली.