उल्हासनगर महापालिका समाजमंदिरे वाऱ्यावर? गैरवापर होत असल्याचीही टीका
By सदानंद नाईक | Updated: November 15, 2022 17:52 IST2022-11-15T17:51:36+5:302022-11-15T17:52:28+5:30
समाजमंदिराची दुरावस्था झाली असून गैरवापर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा

उल्हासनगर महापालिका समाजमंदिरे वाऱ्यावर? गैरवापर होत असल्याचीही टीका
सदानंद नाईक, उल्हासनगर: नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधीच्या निधीतून बांधलेल्या महापालिका समाजमंदिरावर ताबा कोणाचा? असा प्रश्न विचारला जात आहे. समाजमंदिराची दुरावस्था झाली असून त्याचा गैरवापर होत असल्याची टीका होत आहे. उल्हासनगर महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी तब्बल ११३ समाजमंदिर शहरातील विविध भागात बांधण्यात आली. मात्र बांधलेली समाजमंदिरे महापालिकेच्या ताब्यात नसून माजी नगरसेवक, समाजसेवक यांच्या ताब्यात आहेत. त्याचा गैरवापर होत असल्याचे चित्र शहरात आहे. यातील अनेक समाजमंदिराची दुरावस्था झाली असून त्यावर अतिक्रमण होण्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी होत आहेत. महापालिका मालमत्ता व्यवस्थापक राजेश घनघाव यांनी शहरात ११३ समाजमंदिर असून ती सर्व महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले. तसेच प्रभाग समिती कार्यालया अंतर्गत समाजमंदिर येत असल्याचेही घनघाव म्हणाले. प्रत्यक्षात बहुतांश समाजमंदिरे माजी नगरसेवक व समाजसेवक यांच्या ताब्यात आहेत. समाजमंदिरात विविध कार्यक्रम होत असून त्यांचा फायदा कोणाला? असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिका समाजमंदिरासह सार्वजनिक शौचालयावर अतिक्रमण होत असून महापालिकेने समाजमंदिर महापालिकेच्या ताब्यात असल्याचे यादी संख्येसह नागरिकांना सांगावे. असे आवाहन बीएसपीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. प्रशांत इंगळे यांनी केली. खुल्या जागा, भूखंड, शासकीय जागा, समाजमंदिर, शौचालय आदी भूमाफियांच्या घस्यात जात असून महापालिका आयुक्तांनी याबाबत पारदर्शक चौकशी केल्यास, मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे बोलले