Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

By सदानंद नाईक | Published: August 10, 2022 05:29 PM2022-08-10T17:29:29+5:302022-08-10T17:29:52+5:30

Ulhasnagar News: हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Ulhasnagar News: In Ulhasnagar, BJP's public awakening march in rain | Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

Ulhasnagar News: उल्हासनगरात भाजपची भर पावसात जनजागरण पदयात्रा

Next

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत भाजपने भर पावसात बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी चौक दरम्यान जनजागरण पदयात्रा काढली. पदयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 उल्हासनगर भाजपने हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अभियाना अंतर्गत कॅम्प नं-१ येथील बिर्ला गेट शिवमंदिर ते शिवाजी महाराज चौक दरम्यान जनजागरण पदयात्रेचे आयोजन केले होते. बुधवारी दुपारी १२ वाजता शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रेला सुरवात करण्यात आली. भर पावसात तिरंगा झेंडा फडकवित पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पदयात्रा काढल्याने, नागरिकही त्यामध्ये सहभागी झाले होते. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिना पर्यंत पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष पुरस्वानी यांनी दिली.

जनजागरण पडयात्रेत शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक छतलानी, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. देशाचे अमृतमहोत्सव निमित्त नागरिकांनी घराघरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन यावेळी पुरस्वानी यांनी केले.

Web Title: Ulhasnagar News: In Ulhasnagar, BJP's public awakening march in rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.