दोन कोटी दे, अन्यथा तुझ्या गोशाळेतल्या गायींना मारून टाकेन; चार जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 06:59 PM2022-05-03T18:59:27+5:302022-05-03T19:02:13+5:30

पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

ulhasnagar police registered case against four for demanding Ransom | दोन कोटी दे, अन्यथा तुझ्या गोशाळेतल्या गायींना मारून टाकेन; चार जणांवर गुन्हा दाखल

दोन कोटी दे, अन्यथा तुझ्या गोशाळेतल्या गायींना मारून टाकेन; चार जणांवर गुन्हा दाखल

googlenewsNext

उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील जीवन घोट गोशाळा शांत रूपाने चालविण्यासाठी गोकुलदास दुसेजा यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या आरती दुसेजा यांच्यासह चार जणांवर हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच खंडणी न दिल्यास गोशाळेतील गायी मारण्याची धमकी दिली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात साई जीवन घोट गोशाळा असून ७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता आरती दुसेजा यांनी गोशाळा शांत स्वरूपात चालविण्यासाठी दोन कोटींची खंडणी आरती दुसेजा यांनी गोकुलदास दुसेजा यांच्याकडे मागितली होती. तसेच २३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजाता फोन करून गोशाळेची पाईपलाईन कापल्या बाबत सांगून लॉन्स समोर बोलावून आरती दुसेजा, त्यांचा मुलगा हितेश यांनी मागणी पूर्ण न केल्यास त्यांच्या गोशाळेतील गाई मारून टाकण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार आरती दुसेजा, हितेश दुसेजा, रोहित दुसेजा व एका अनोळखी इसमा विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम सारिपुत्र यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: ulhasnagar police registered case against four for demanding Ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.