Ulhasnagar: महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला, अट्टल दरोडेखोर जेरबंद 

By सदानंद नाईक | Published: July 30, 2024 07:20 PM2024-07-30T19:20:59+5:302024-07-30T19:22:56+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात दहशत माजविणाऱ्या ५ जणांच्या टोळीला महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याना हिललाईन पोलीसाच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे, चोपर, मिरची पावडर, दोरी जप्त केले असून टोळीवर गंभीर स्वरूपाचे २७ गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Ulhasnagar: Robbery attempt at Mahalakshmi Jewelers foiled, Attal robber jailed  | Ulhasnagar: महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला, अट्टल दरोडेखोर जेरबंद 

Ulhasnagar: महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोड्याचा प्रयत्न फसला, अट्टल दरोडेखोर जेरबंद 

- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात दहशत माजविणाऱ्या ५ जणांच्या टोळीला महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्याना हिललाईन पोलीसाच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे, चोपर, मिरची पावडर, दोरी जप्त केले असून टोळीवर गंभीर स्वरूपाचे २७ गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी भागातील महालक्ष्मी ज्वलर्सवर दरोडा पडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस पथकाने २८ जुलै रोजी पाळत ठेवली असता एक टोळी पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान दरोडा टाकण्यासाठी आले. दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतांना, त्यावर पोलीस पथकाने झडप घालून जेरबंद केले. त्यातील दोघांना पळून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून एक पिस्तुल, जिवंत काडतुसे, चोपर, चाकू, मिरची पावडर, दोरी आदी साहित्य जप्त केले. युवराज पवार, राहुल गायकवाड, वासुदेव फकिरा, कल्पेश बाविस्कर, अजय उर्फ कोयता पिल्ले या पाच आरोपीना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली. 

या सराईत गुंडांनी २२ जुलै नेताजी चौकातील एका इसमाला मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. तसेच २५ जुलै रोजी नेताजी चौकातील पान टपरी दुकानदारांना पिस्तुलचा धाक दाखवून दरमहा खंडणीची मागणी केली होती. दोन्ही गुन्हे हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही घटना कैद झाल्या आहेत. या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमले होते. पोलीस चौकशीत यासराईत टोळीवर गंभीर स्वरूपाचे २७ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. यापैकी युवराज पवार याच्यावर तडीपाराची तर राहुल गायकवाड याच्यावर शिवाजीनगर पोलिसांनी एमपीडिए अंतर्गत कारवाई केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत

Web Title: Ulhasnagar: Robbery attempt at Mahalakshmi Jewelers foiled, Attal robber jailed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.