प्लॅस्टीक पिशवीत सापडलेला टायगर झाला ३ वर्षाचा, वाढदिवस साजरा, दत्तक प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 04:36 PM2021-12-30T16:36:03+5:302021-12-30T16:37:06+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेणुका सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात तीन वर्षांपूर्वी ३० डिसेंबरला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज काही महिलांना आला

Ulhasnagar Tiger turns 3 years old, celebrates birthday by cutting a cake, adoption process begins | प्लॅस्टीक पिशवीत सापडलेला टायगर झाला ३ वर्षाचा, वाढदिवस साजरा, दत्तक प्रक्रिया सुरू

प्लॅस्टीक पिशवीत सापडलेला टायगर झाला ३ वर्षाचा, वाढदिवस साजरा, दत्तक प्रक्रिया सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना टायगरची तब्येत खालावल्याने, मुंबई येथील वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : तीन वर्षांपूर्वी नालीत प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडलेल्या टायगर तीन वर्षांचा झाला असून त्याचा तिसरा वाढदिवस नवीमुंबईतील विश्वबालक केंद्रात समाजसेवक रगडे कुटुंबांनी सहकाऱ्यांसह साजरा केला. टायगरला जीवनदान देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार ज्योती कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांनी पुढाकार घेतला होता. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेणुका सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात तीन वर्षांपूर्वी ३० डिसेंबरला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज काही महिलांना आला. स्थानिक महिलांनी सदर माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांना दिल्यावर, रगडे यांनी याबाबतची माहिती मध्यवर्ती पोलिसांना दिली. तसेच उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. नाल्यातील दूषित पाणी बाळाच्या डोळ्यात गेल्याने उपचार सुरू केले. दरम्यान मेंदूत संसर्ग झाल्याचे उपचारा दरम्यान उघड झाल्यावर, टायगरचा जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. अश्यावेळी रगडे यांनी औषध उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून बालन्यायालयाच्या आदेशाने टायगरला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. 

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना टायगरची तब्येत खालावल्याने, मुंबई येथील वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांची मदत कामी आली. सलग १८ दिवस टायगरला दूध देण्यात आल नाही. केवळ औषध व रक्त चढवण्यात चढविण्यात आले होते. मेंदूत संसर्ग झाल्याने, अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियासाठी निधी उभा करण्यासाठी रुग्णालयाने केटो या फँड रेजिंग एनजीओ बरोबर करार केला. अवघ्या २४ तासात १० लाख ४२ हजार रुग्णालयाचे खुल्या केलेल्या रुग्णालयात जमा झाले. ५ एप्रिलला टायगरला रुग्णालयातून सुट्टी मिळाली तरी धोका कायम होता. पोलीसांनी महिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार नवीमुंबई येथील नेरुळ मधील विश्व बालक केंद्र येथे टायगरचे पालनपोषण होत आहे. 

टायगर झाला सेलिब्रेटी, सलमान खानही दिवाना 

टायगर जिवंत राहण्यासाठी सर्वाधिक काळजी समाजसेवक शिवाजी रगडे कुटुंबांनी घेतली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, माजी महापौर पंचम कलानी, डॉक्टर, नर्स यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. टायगर जिवंतकथा ऐकल्यावर सिनेअभिनेता सलमान खान यांनीही भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काही कारणामुळे भेट झाली नाही.

Web Title: Ulhasnagar Tiger turns 3 years old, celebrates birthday by cutting a cake, adoption process begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.