उल्हासनगर परिवहन बस ट्रायलबेसवर सुरू, शहाड स्टेशन ते कैलास कॉलनी दरम्यान दोन फेऱ्या
By सदानंद नाईक | Published: March 12, 2024 06:46 PM2024-03-12T18:46:05+5:302024-03-12T18:46:25+5:30
उल्हासनगर महापालिकेने स्वतःची परिवहन बससेवा तब्बल ७ वर्षानंतर सुरू केली. मात्र पहिल्या दिवशी चार्जिंगमुळे ठप्प पडलेली परिवहन बससेवेची सुरवात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ट्रायलबेसवर सुरू झाली.
उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवेतील येणारे अडथळे पार करून सकाळी व संध्याकाळी शहाड रेल्वे स्टेशन ते शिवमंदिर कैलास कॉलनी दरम्यान एक बस ट्रायलबेसवर चालविण्यात आली. नागरिकांनी विनातिकीत प्रवासाचा आनंद महापालिका बस मध्ये लुटला आहे.
उल्हासनगर महापालिकेने स्वतःची परिवहन बससेवा तब्बल ७ वर्षानंतर सुरू केली. मात्र पहिल्या दिवशी चार्जिंगमुळे ठप्प पडलेली परिवहन बससेवेची सुरवात दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी ट्रायलबेसवर सुरू झाली. सकाळी व संध्याकाळी एक बस शहाड रेल्वे स्टेशन ते कॅम्प नं-५ कैलास कॉलनी व कैलास कॉलनी ते शहाड स्टेशन दरम्यान धावली. दिवसभरात एका बसने दोन फेऱ्या मारल्या असून बस मध्ये बसलेल्या नागरिकांची फुकटात प्रवास केला. बस कॅडेक्टरने फक्त नागरिकांची नावे लिहून ठेवली. बससेवेमुळे महापालिका बस सुरू झाली. असा मॅसेज नागरिकापर्यंत पोहोचविला गेल्याचे, परिवहन बस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आता अशी किती दिवस बस ट्रायलबेसवर सुरू राहणार. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले आहे.
शहाड येथील बसडेपो मध्ये बस चार्जिंगसह पाण्याची व्यवस्था, बस क्लिनिंग सेवा, बस दुरुस्तीसाठी रॅम्पचे काम लवकर होणे गरजेचे आहे. तसे संकेत परिवहन बस विभागाच्या अधिकाऱ्याने दिले. तसेच रिजेन्सी व उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ बस डेपोच्या कामाला लवकरच सुरू करण्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. बस डेपो आगरप्रमुख, व्यवस्थापक, बस ड्रायव्हर, कॅडेक्टर, तिकीट तपासनीस, कॅशियर आदी कर्मचारी तैनात असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.
बस चार्जिंग सुविधा
महापालिका परिवहन बस सेवेच्या पहिल्याच दिवशी बस चार्जिंग अभावी बस सेवा ठप्प झाली. बस चार्जिंगची समस्या निकाली निघाली असून पाचही बसची चार्जिंग पूर्ण झाल्याची माहिती उपायुक्त नाईकवाडे यांनी दिली. तसेच शहाड बस डेपोत काही दिवसात चार्जिंग स्टेशन सुरू होण्याचे संकेत दिले आहे.
परिवहन बससेवा ट्रायलबेसवर नको
शहरातील नागरिक बससेवेसाठी उत्सुक असून महापालिका परिवहन बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी होत आहे. परिवहन बससेवा ट्रायलबेस नको. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
परिवहन बसला अडथळ्याची शर्यत
महापालिका परिवहन बससेवेला अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागणार आहे. बस डेपोसह बस स्टॉप, कर्मचारीवर्ग, बस दुरुस्ती रॅम, तिकीट दर, चार्जिंग स्टेशन आदींची सुविधा निर्माण करावी लागणार आहे.