उल्हासनगर वाहतूक विभागाची मॉडीफाईड बुलेट गाडीवर कारवाई; सव्वा दोन लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:03 PM2021-02-04T19:03:50+5:302021-02-04T19:03:55+5:30
उल्हासनगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त दत्ता तोटेवाड व आरटीओ विभागाचे दीपक शिंदे यांनी शहरात मॉडीफाईड केलेल्या बुलेटवर संयुक्तपणें कारवाई केली.
उल्हासनगर : शहर वाहतूक विभाग व आरटीओ विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवून मॉडीफाईड केलेल्या २९ बुलेटवर कारवाई केली. त्यांच्याकडून २ लाख २५ हजाराचा दंड वसूल केला असून अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिलीं आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त दत्ता तोटेवाड व आरटीओ विभागाचे दीपक शिंदे यांनी शहरात मॉडीफाईड केलेल्या बुलेटवर संयुक्तपणें कारवाई केली. मोहिमे अंतर्गत एकूण २९ बुलेटची तपासणी केली असता, त्यातील १४ बुलेट गाडी मालकाकडून २ लाख २५ हजाराचा दंड वसूल केला. तसेच त्यांना मेमो देण्यात आला आहे.
इतर १५ बुलेट वाहन चालकांना गाडीचे कागदपत्र तपासणी साठी उप प्रादेशिक विभाग कल्याण कार्यालयात बोलाविण्यात आले. उप प्रादेशिक विभाग कल्याण कार्यालयाचे दिपक शिंदे, जयवंत फोन्दफुके, संजय फुंदे प्रशांत सूर्यवंशी यांच्यासह शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक भालेश साळुंखे, जितेंद्र चव्हाण बालाजी पंडित, आदींनी सहभाग घेतला.