उल्हासनगर वडोलगावच्या रस्त्याची निवडणुकीपूर्वी बांधणी, स्थानिक नागरिकांचा बहिष्कार मागे

By सदानंद नाईक | Published: April 20, 2024 06:17 PM2024-04-20T18:17:23+5:302024-04-20T18:17:34+5:30

 उल्हासनगर कॅम्प नं-३ वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो.

Ulhasnagar Vadolgaon road construction before election, boycott of local citizens behind | उल्हासनगर वडोलगावच्या रस्त्याची निवडणुकीपूर्वी बांधणी, स्थानिक नागरिकांचा बहिष्कार मागे

उल्हासनगर वडोलगावच्या रस्त्याची निवडणुकीपूर्वी बांधणी, स्थानिक नागरिकांचा बहिष्कार मागे

उल्हासनगर : वडोलगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्त अजीज शेख यांनी दिल्यावर, स्थानिक नागरिकांनी निवडणुकीवर घालण्यात येणाऱ्या बहिष्काराचा इशारा मागे घेतला. रस्ता पुनर्बांधणीच्या नावाखाली एका वर्षांपासून रस्ता खोदून ठेवल्याने, स्थानिक नागरिकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले होते.

 उल्हासनगर कॅम्प नं-३ वालधुनी नदी पलीकडे वडोलगाव असून गावात जाण्यासाठी वालधुनी नदीच्या पुलाचा वापर नागरिकांना करावा लागतो. पुनर्बांधणीच्या नावाखाली, गेल्या एका वर्षांपासून महापालिकेने रस्ता खोदून ठेवला. खोदलेल्या या रस्त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे, वृद्ध, शाळेकरी मुले, व महिलांचे हाल होत आहे. वाहनेही कसरत करून नागरिकांना न्यावी लागत आहे. हा त्रास वाचविण्यासाठी रस्ताच्या पुनर्बांधणीची मागणी स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे महापालिकेला वारंवार केली. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने, नागरिकांत संताप व्यक्त झाला. लोकसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याची पुनर्बांधणी झाली नाहीतर, निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे निवेदन महापालिका आयुक्त अजीज शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्यासह स्थानिक पोलीस ठाण्याला स्थानिक नागरिकांनी दिले. याप्रकाराने एकच खळबळ उडल्यावर, आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी याची दखल घेऊन निवडणुकीपूर्वी रस्ता पुनर्बांधणीचे लेखी पत्र काढले आहे. 

कॅम्प नं-५ येथील जयजनता कॉलनी मध्ये १५ दिवसापूर्वी बांधलेला रस्ता निकृष्ट बांधल्याने पुन्हा खोदला. अशी टीका महापालिका कामकाजावर होतं आहे. तर बुधवारी एका टोळक्याने कॅम्प नं-४ येथील सेंट्रल पार्क हॉटेल समोर विशाल माखीजा नावाच्या बांधकाम ठेकेदारा सोबत वाद घालून मारहाण केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे रस्ता पुनर्बांधणी व भुयारी गटार योजने अंतर्गत खोदलेले बहुतांश रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, धुळीच्या प्रमाणात वाढ होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे.

Web Title: Ulhasnagar Vadolgaon road construction before election, boycott of local citizens behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.