उल्हासनगरातील वालधुनी नदीपूल पूर्णत्वाकडे, शहर अभियंताकडून पुलाची पाहणी

By सदानंद नाईक | Published: June 24, 2024 06:35 PM2024-06-24T18:35:08+5:302024-06-24T18:36:38+5:30

Ulhasnagar News: उल्हासनगर शहर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुलाच्या कामाची पाहणी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली. येत्या काही दिवसात पूल नागरिकांना खुला करण्यात येणार असल्याचे सेवकांनी म्हणाले आहे.

Ulhasnagar: Valdhuni River Bridge at Ulhasnalgarh towards completion, Bridge Inspection by City Engineer | उल्हासनगरातील वालधुनी नदीपूल पूर्णत्वाकडे, शहर अभियंताकडून पुलाची पाहणी

उल्हासनगरातील वालधुनी नदीपूल पूर्णत्वाकडे, शहर अभियंताकडून पुलाची पाहणी

- सदानंद नाईक 
उल्हासनगर : शहर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुलाच्या कामाची पाहणी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली. येत्या काही दिवसात पूल नागरिकांना खुला करण्यात येणार असल्याचे सेवकांनी म्हणाले आहे.

उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणारा एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने, पुनर्बांधणीसाठो दोन वर्षांपूर्वी महापालिकेद्वारे पूल तोडण्यात आला? तेंव्हा पासून तांत्रिक कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. पुला शेजारील जलवाहिनेचे काम पूर्ण होताच पुलाच्या कामाला सुरुवात होऊन पूल बांधून पूर्ण झाला. रेल्वे स्टेशन पश्चिमकडे जाणार हा एकमेव पूल असून पुलावरून वाहनांची ये-जा थेट स्टेशन पर्यंत होणार आहे. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी स्थानिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकासह पुलाची पाहणी केली. पुलाची डागडुजी झाल्यानंतर नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

उल्हासनगर पश्चिम रेल्वेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वालधुनी नदीवरील पुल सर्वांना खुला झाल्यावर, सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या वालधुनी नदीवरील पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. त्या पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत महापालिका बांधकाम विभागाने दिले. दोन्ही पूल बांधून पूर्ण झाल्यावर, स्टेशन बाहेरील भूखंडावर महापालिका परिवहन बस सेवेचे मुख्य स्टेशन व आगार प्रस्तावित आहे. यासाठी केंद्राकडून १५ कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली असून नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. आयुक्त अजीज शेख यांनी वालधुनी नदीवरील पुलाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष दिले होते. एकीकडे शहर विकास कामाला गती आली असून दुसऱ्याकडे काही प्रकल्प रखडल्याचा आरोप होत आहे. वालधुनी नदीवरील पूल पूर्ण बांधून वाहतूकीस खुला करण्याचा मानस यावेळी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ulhasnagar: Valdhuni River Bridge at Ulhasnalgarh towards completion, Bridge Inspection by City Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.