उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

By admin | Published: April 12, 2017 03:42 AM2017-04-12T03:42:37+5:302017-04-12T03:42:37+5:30

उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.

Ulhasnagar water for half an hour after two days | उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

उल्हासनगरला दोन दिवसांनी अर्धा तास पाणी

Next

उल्हासनगर : उल्हासनगरच्या नागरिकांना गरजेपेक्षा दुप्पट पाणीपुरवठा होत असूनही निम्म्या शहरात दोन दिवसांनी तेही अर्धा तास पाणी मिळत असल्याने परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे. उरलेल्या शहराला सध्या एक दिवसाआड पाणी मिळते आहे. एप्रिल महिना सुरू होताच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील किमान दोन महिने उल्हासनगरच्या नागरिकांना कोणत्या परिस्थितीत काढावे लागतील, याची चुणूक यातून मिळाली आहे.
सध्या उल्हासनगरची पाणीचोरी आणि गळती ४० टक्क्यांवर गेली आहे. या टंचाईविरोधात शिवसेनेने लगेचच उपोषणाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आहे. एमआयडीसीकडून १२९ एमएलडी पाणीपुरवठा होऊनही पाणी मुरते कुठे, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी पालिकेला केला. अशीच परिस्थिती राहिल्यास पालिकेच्या पहिल्या महासभेच्या दिवशी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला. अनेकदा आवाज उठवूनही परिस्थिती सुधारत नसल्याने उपोषण करावे लागल्याचे नगरसेवक अरूण अशान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर : लोकसंख्येच्या दुप्पट पाणीपुरवठा होऊनही पाणीटंचाई असल्याची माहिती आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. शहरात ३०० कोटीची पाणी वितरण योजना राबविल्यावरही पाणीटंचाई कायम आहे.

टंचाई असलेले परिसर : कॅम्प नंबर चारच्या परिसरातील मराठा सेक्शन, जिजामाता गार्डन, ओटी सेक्शन, भीमनगर, मद्रासीपाडा, सुभाष टेकडी, संभाजी चौक, सत्यसाई शाळा परिसर, गायकवाड पाडा, कैलास कॉलनी, समतानगर, तानाजीनगर, महादेवनगर, लालचक्की आदी परिसरात तीव्र पाणीटंचाई आहे.

प्यायला तरी पाणी द्या! : महापालिकेने राबवलेली ३०० कोटींची पाणी वितरण योजना पूर्णत: फसली आहे. नागरिकांना किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी उपोषणाला बसलेले नगरसेवक अरूण अशान, शेखर यादव, सुनील सुर्वे, सोनु सान्पुर, माजी महापौर व नगरसेविका लीलाबाई आशान आदींनी केली आहे.

Web Title: Ulhasnagar water for half an hour after two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.