उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 06:23 PM2021-09-06T18:23:45+5:302021-09-06T18:24:24+5:30

Ulhasnagar : क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगरसेवक धनंजय बोडारे यांनी सतत पाठपुरावा शासनाकडे केला.

Ulhasnagar Water Treatment Plant will be inaugurated by the Guardian Minister on Tuesday | उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

उल्हासनगर जलशुद्धीकरण केंद्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण 

googlenewsNext

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : अमृत योजने अंतर्गत वडोलगाव, शांतीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रासह अग्निशमन दलाच्या बोट, भुयारी गटार साफ करण्यासाठी रॉबर्ट आदीचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिटीसी मैदानात होणार आहे. त्याच बरोबर २५ कोटीच्या निधीतून व्हिटीसी मैदानात भव्य क्रीडा संकुलाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती महापौर अशान यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना मित्र पक्षांनी विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा आयोजन व्हिटीसी मैदानात मंगळवारी पार पडणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात भुयारी गटारीची मुख्य वाहिनी पूर्णतः नव्याने टाकण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्र शांतीनगर व वडोलगाव येथे उभारण्यात आले. दोन्ही केंद्राचे काम सुरळीत सुरू झाले असून त्यांचा लोकार्पण सोहळा व्हिटीसी मैदान येथुन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच महापालिका अग्निशमन विभागाची दखल राष्ट्रपती गोविंद यांनी घेऊन विभागाच्या ४ जवानांना राष्ट्रपती शौर्य पदकाने गौरविण्यात आले. 

अग्निशमन दल अधिक कार्यक्षम होण्यासाठी विभागासाठी अत्याधुनिक बोट खरेदी करण्यात आल्या. तसेच भुयार गटारीची साफसफाई करण्यासाठी रॉबर्ट घेण्यात आला असून त्यांचेही लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. व्हिटीसी मैदानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने २५ कोटीच्या निधीतून भव्य क्रीडा संकुल उभे राहणार असून त्याचे भूमिपूजन सोहळा मंगळवारी दुपारी ३ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगरसेवक धनंजय बोडारे यांनी सतत पाठपुरावा शासनाकडे केला. महापौर लिलाबाई अशान यांच्या प्रयत्नाने १०२ कोटीचा निधी गेल्या महिन्यात शहराला मिळाल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला पालकमंत्रीसह खासदार श्रीकांत शिंदे, आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदीजन उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Ulhasnagar Water Treatment Plant will be inaugurated by the Guardian Minister on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.