पाणी पुरवठा विभागवार टीकास्त्र; उल्हासनगर जलकुंभ उद्यान बनले दारुडा उद्यान

By सदानंद नाईक | Published: November 7, 2023 02:51 PM2023-11-07T14:51:16+5:302023-11-07T14:52:14+5:30

उद्यानात दारूच्या बॉटल्सचा खच पडला आहे.

ulhasnagar watershed park became liquor park | पाणी पुरवठा विभागवार टीकास्त्र; उल्हासनगर जलकुंभ उद्यान बनले दारुडा उद्यान

पाणी पुरवठा विभागवार टीकास्त्र; उल्हासनगर जलकुंभ उद्यान बनले दारुडा उद्यान

सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील जलकुंभाच्या खाली महापाकिकेने नागरिकांच्या सोयीसाठी उद्यान विकसित केले. मात्र उद्यानाचा कब्जा नशेखोरांनी घेतला असून उद्यानात दारूच्या बॉटल्सचा खच पडला आहे.

 उल्हासनगर महापालिकेने उंच जलकुंभाच्या खाली नागरिकांच्या विरंगुळा खाली उद्यान विकसित केले. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरातील शासकीय बालगृह शेजारील उंच जलकुंभाखाली उद्यान विकसित केले. सुरवातीला मुले, महिला, वृद्ध इसम येत होते. मात्र कालांतराने उद्यानाच्या कब्जा स्थानिक नशेखोरांनी घेतल्याने, मुले, वृद्ध, महिलांनी उद्यानाकडे पाठ फिरविली आहे. उंच जलकुंभाचा परिसरात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित असल्याने, त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना क्षेत्र निषेध असतो. मात्र याठिकाणी माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते पार्ट्या झोडत असल्याचे चित्र आहे. सर्वत्र दारूच्या बॉटल्सचा खच पडला आहे.

 समाजसेवक प्रशांत चंदनशिवे यांनी याबाबतची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांना दिली. मात्र याबाबत अद्यापही काहीएक कारवाई झाली नसल्याने, दिवाळी दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास, बुडगे जबाबदार राहणार असल्याचे चंदनशिवे यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेने कॅम्प नं-४ येथील जिजामाता उद्यान येथील उंच जलकुंभ, सार्वजनिक हॉल येथील सिद्धार्थ वॉटर सफ्लाय येथील उंच जलकुंभ आदी अनेक जलकुंभाखाली नागरिकांच्या सुखसुविधासाठी उद्यान उभारले आहे. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांच्याशी संपर्क केला असता झाला नाही.

Web Title: ulhasnagar watershed park became liquor park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.