उल्हासनगरच्या तरुणाचा भुशी धरणात बुडून मृत्यू

By admin | Published: June 29, 2015 01:53 AM2015-06-29T01:53:16+5:302015-06-29T01:53:16+5:30

भुशी धरणात पोहताना अमोल अनिल चव्हाण (२२, रा. विठ्ठलवाडी, उल्हासनगर) या तरुणाचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला.

Ulhasnagar youth drowned in Bhushi dam | उल्हासनगरच्या तरुणाचा भुशी धरणात बुडून मृत्यू

उल्हासनगरच्या तरुणाचा भुशी धरणात बुडून मृत्यू

Next

लोणावळा : येथील भुशी धरणात पोहताना अमोल अनिल चव्हाण (२२, रा. विठ्ठलवाडी, उल्हासनगर) या तरुणाचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला.
रविवार असल्याने भुशी धरण परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. अनिल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. मात्र पोहताना दमछाक झाल्याने तो पाण्यात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
लोणावळा परिसरात दोन दिवसांत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी दुर्घटना आहे. शनिवारी भाजे लेणीजवळील धबधब्यातील जलाशयात बुडून पुण्यातील युवकाचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Ulhasnagar youth drowned in Bhushi dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.