उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:12 AM2018-03-01T02:12:33+5:302018-03-01T02:12:33+5:30

पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.

Ulhasnagar's development stalled; The time of hunger on saheed and traders of Hajilangababa | उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

Next

उल्हासनगर : शहराला पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शहर विकासाला चालना मिळणार असल्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. हे गृहीत धरून व्यापा-यांनी कधी नव्हे तो भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, सत्तेच्या एका वर्षानंतर शहरातील विकासकामे ठप्प पडली असून राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला.
तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या कालावधीत अडीच वर्षांपूर्वी अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणावेळी अंशत: बाधित व्यापाºयांना दोन मजली बांधकाम, तर पूर्णत: बाधित व्यापा-यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी दिले. मात्र, यापैकी कुठलेही आश्वासन महापालिका व राजकीय नेत्यांनी पूर्ण केले नाही.
शहरातील जीन्स उद्योग बंद पडल्याने या उद्योगावर अवलंबून असलेले २५ हजारांपेक्षा अधिक कामगार बेकार झाले. त्यांच्यावर स्थलांतरित होण्याची वेळी आली असून जीन्स कारखाने भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर यासह ग्रामीण भागांत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडून अनेक जीन्सची दुकाने बंद झाली आहेत. अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याची कामे रखडली आहेत. दोनशेपेक्षा जास्त पूर्णत: बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा दिली नसल्याने त्यांचे व्यवसाय बुडीत निघून उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या मुलांनी शिक्षण सोडून नोकरी पत्करली आहे.
पूर्ववैभवासाठी व्यापारी आक्रमक-
शहराचे पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी देवाला साकडे घालण्याची वेळ व्यापारी संघटनेवर आली. गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नगरसेवकांकडून असहकार्याच्या धोरणामुळे शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली होती. आयुक्तांच्या प्रतिक्रियेला सुमित चक्रवती यांनी पाठिंबा दिला असून शहराच्या विकासासाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी हाजीमलंगबाबाला चादर चढवली आहे.
चक्रवर्ती ओमी टीम समर्थक
सुमित चक्रवर्ती ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी यांनी आयुक्तांच्या विविध कामांची स्तुती केली आहे. अशावेळी चक्रवर्ती यांनी महापालिकेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून चक्रवर्ती यांच्याआड ओमी आयुक्तांवर निशाणा साधत तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Ulhasnagar's development stalled; The time of hunger on saheed and traders of Hajilangababa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.