उल्हासनगरचा धीरज गवई दिल्लीत चमकला; केंद्राचा तंत्रज्ञानातील उपक्रम पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:03 PM2022-04-27T23:03:40+5:302022-04-27T23:05:02+5:30

आयएफसीआय,एमडीआय गुडगाव आणिआयआयटी दिल्ली यांनी वर्षातील सर्वात आशादायक तंत्रज्ञान उद्योजक म्हणून त्यांची निवड केली आहे.

Ulhasnagar's Dhiraj Gavai in Delhi; Honored with the Centre's Technology Initiative Award | उल्हासनगरचा धीरज गवई दिल्लीत चमकला; केंद्राचा तंत्रज्ञानातील उपक्रम पुरस्काराने सन्मानित

उल्हासनगरचा धीरज गवई दिल्लीत चमकला; केंद्राचा तंत्रज्ञानातील उपक्रम पुरस्काराने सन्मानित

Next

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : केंद्र सरकारच्या आईएफसीआई वेंचर कैपीटल फंड्स लिमिटेड व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीचा व तंत्रज्ञानातील सर्वोत्कृष्ठ उपक्रम पुरस्काराने धीरज गवई यांना सन्मानित करण्यात आले. दिल्लीत गेल्या आठवड्यात पुरस्काराचे वितरण झाले असून गवई हे जीटेक एप्लीकेशन इनटेलीजैंस प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे सर्वेसर्वा असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष रोहीत साळवे यांनी दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दिल्लीत अनुसूचित जातीमधील उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी डॉ. आंबेडकर युवा उद्यमी लीगच्यावतीने डॉ. आंबेडकर इंटरनेशनल सेंटर ,जनपथ नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारितामंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते आणि संसदीयकार्य राज्य मंत्री अर्जुन मेघवाल, सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ए. नारायण स्वामी व सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत धिरज गवई यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. धिरज गवईंनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर हा पुरस्कार पटकावून उल्हासनगर शहराच्या शिरपेचात एकप्रकारे मानाचा तुरा रोवला आहे. आयएफसीआय,एमडीआय गुडगाव आणिआयआयटी दिल्ली यांनी वर्षातील सर्वात आशादायक तंत्रज्ञान उद्योजक म्हणून त्यांची निवड केली आहे.

धिरज गवई हे माजी जिल्हाधिकारी वसंत गवई यांचे सुपूत्र असून त्यांचे शालेय शिक्षण अंबरनाथ येथील इनरविल स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये झालेले आहे. रामराव अदिक महाविद्यालय नेरुळ येथून त्यांनी इंजिनीयरिंग कॉम्पुटरचे पदवीचे शिक्षण घेतले आहे. उल्हासनगर शहरातील प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत साळवे यांचे धीरज गवई भाचे आहेत. शहरातून धिरज गवई यांचे अभिनंदन होत असून काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, माजी नगरसेविका अंजली साळवे यांच्यासह अनेकांनी धिरज गवई यांचे अभिनंदन केले आहे. सद्या धीरज गवई कलनगर बांद्रा येथे राहण्यास गेले.

Web Title: Ulhasnagar's Dhiraj Gavai in Delhi; Honored with the Centre's Technology Initiative Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.