उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत

By admin | Published: January 29, 2017 03:14 AM2017-01-29T03:14:59+5:302017-01-29T03:14:59+5:30

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या चार नगरसेवकांसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्व ७८ जागा लढवणार असून

Ulhasnagar's four corporators Shivsenaet | उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत

उल्हासनगरचे चार नगरसेवक शिवसेनेत

Next

उल्हासनगर : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध पक्षांच्या चार नगरसेवकांसह अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्व ७८ जागा लढवणार असून महापौर शिवसेनेचाच असेल, असा दावा शिंदे यांनी केला.
उल्हासनगरात एकीकडे भाजपा, ओमी कलानी टीम व रिपाइंची आघाडी तयार झाली. तर, दुसरीकडे शिवसेनेने महायुती बनवण्याचा निर्धार केला आहे. निवडणूक प्रचारात आघाडी घेऊन इतर पक्षांच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश देणे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मराठा सेक्शन येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी एकूण २९७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी काँगे्रस पक्षाच्या नगरसेविका मीना सोंडे, रिपाइंच्या गटनेत्या पुष्पा बागुल, साई पक्षाचे नगरसेवक अंकुश म्हस्के, अपक्ष नगरसेवक विजय पाटील, माजी नगरसेवक किशोर वनवारी, कैलास तेजी, रिपाइं आठवले गटाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी पक्षात प्रवेश केला.
ओमी कलानी टीममधील हरी कनोजिया, इंदर गोपलानी, जितू चैनानी आदींसह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना सर्वच्या सर्व ७८ जागा लढणार असून स्वच्छ व सुुंदर शहर करण्याचा वचननामा प्रसिद्ध करणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.
रिपाइंच्या इतर गटांसोबत चर्चा सुरू असून २ फेबु्रवारीपूर्वी पक्षाची अधिकृत यादी प्रसिद्ध करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी साई पक्षासोबत बोलणी सुरू असल्याचे संकेत दिले.(प्रतिनिधी)

Web Title: Ulhasnagar's four corporators Shivsenaet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.