अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:39 AM2017-08-10T05:39:25+5:302017-08-10T05:39:25+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले.

 Ultimately, the city of Ulhasnagar has become a hawk-panchayat-free center | अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

अखेर उल्हासनगर शहर झाले हगणदारीमुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत समितीने शहराला हगणदारी मुक्त म्हणून जाहीर केले. राज्यस्तरीय समितीने पहिल्या फेरीत नापास झाल्यावर शहर दुसºया फेरीत हगणदारीमुक्त झाले. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, मनिष हिवरे, अलका पवार यांच्यासह स्वच्छता निरीक्षक, मुकादम व कर्मचारी यांना याचे श्रेय जाते.
राज्यस्तरीय समितीने सहा महिन्यांपूर्वी शहराची पाहणी केली होती. त्यावेळी सार्वजनिक स्वच्छतागृहासह अन्य बाबींवर समितीने ताशेरे ओढून सुधारणा करण्याचे सुचवले होते. महापालिकेला हगणदारीमुक्त करण्यासाठी आयुक्त निंबाळकर यांनी स्वत: गुडमॉर्निंग टीमसह सकाळी सहा वाजता डम्पिंग ग्राउंडसह झोपडपटीच्या परिसराचा दौरा केला. प्रातर्विधीसाठी उघडयावर जाणाºया नागरिकांना समजावत गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले. महापालिकेसह एमएमआरडीएच्या एकूण ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती करून त्यांना पाणी व वीजपुरवठा सुरू केला. २ हजार ४६१ वैयक्तिक स्वच्छतागृह गरजूंना बांधून दिली. १० सामूहिक स्वच्छतागृह नव्याने बांधून ३ फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था केली.
स्वच्छ महाराष्ट्र अभियान समितीच्या अहवालात नापास झालेल्या शहराला पास करण्यासाठी आयुक्तांनी उल्हासनगर स्वच्छ व सुंदरचा नारा दिला. त्यांनी गेल्या सहा महिन्यात विविध उपक्रम राबवले. प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाºयांचे पथक आयुक्तांनी स्थापन करून जनजागृतीवर भर दिला.
शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी आयुक्तांसह उपायुक्त संतोष देहरकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शिंपी, मनीष हिवरे, अलका पवार, स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांनी प्रयत्न केले.
राज्यस्तरीय समितीमध्ये विरार-वसई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त हेरवाडे, ठाणे महापालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, राहुल खंडारे, दयानंद जाधव व किशोर पाटील यांचा समावेश होता. पथकाच्या दोन दिवसाच्या पाहणी नंतर शहराला पथकाने हगणदारी मुक्त असल्याचा अहवाल दिला.

ओल्या, सुक्या कचऱ्यासाठी डबे
महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवणार आहेत. त्यापैकी प्रत्येक घरांना ओल्या-सुक्या कचरा ठेवण्यासाठी स्वतंत्र डबे विनामूल्य देणार आहे. तसेच स्वच्छतेबाबत वर्षभर जनजागृती अभियान सुरू ठेवण्याचा मानस मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी व्यक्त केला. प्रत्येक चौक व सोसायटीजवळ मोठी कचरा पेटीही ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था
शहर हगणदारीमुक्त झाल्याचे राज्यस्तरीय पथकाने जाहीर केले आहे. तरीही काही सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यातील सांडपाणी
रस्त्यावर वाहते. सहा महिन्यात ५५० सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती केल्याचा दावा मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी केला आहे.

Web Title:  Ultimately, the city of Ulhasnagar has become a hawk-panchayat-free center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.