अनधिकृत बांधकामांमुळे नागरी सेवावरील ताण वाढतो -जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:51+5:302021-06-28T04:26:51+5:30

मुंब्रा : कौसा भागातील घासवाला कम्पाउंड येथे अल्पावधीत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांनी उभारलेल्या स्व. मौलाना ...

Unauthorized constructions increase stress on civil service - Jitendra Awhad | अनधिकृत बांधकामांमुळे नागरी सेवावरील ताण वाढतो -जितेंद्र आव्हाड

अनधिकृत बांधकामांमुळे नागरी सेवावरील ताण वाढतो -जितेंद्र आव्हाड

Next

मुंब्रा : कौसा भागातील घासवाला कम्पाउंड येथे अल्पावधीत ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ पठाण यांनी उभारलेल्या स्व. मौलाना शोएब खान प्ले ग्राउंडचे, तसेच गार्डनचे उद्‌घाटन शनिवारी रात्री गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनधिकृत बाधकामांमुळे पाणी, रस्ते, वीज यासारख्या नागरी सेवांवरील ताण वाढतो. यामुळे अनधिकृत बांधकामे थांबविण्याचे आवाहन आव्हाड यांनी केले, तसेच पठाण यांनी ठामपा क्षेत्रात गार्डन उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी परिवहन समितीचे सदस्य शमीम खान, राकाँपाचे प्रदेश सचिव सय्यदअली अशरफ, संघर्ष महिला संघाच्या अध्यक्षा ऋता आव्हाड, नगरसेवक सिराज डोंगरे, मोरेश्वर किणे आदींची उपस्थिती होती.

...............

वाचली

Web Title: Unauthorized constructions increase stress on civil service - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.