ठाण्यात होर्डिंगचे अनधिकृत मनोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 09:14 PM2020-12-23T21:14:10+5:302020-12-23T21:14:33+5:30

भ्रष्ट अधिकार्‍यांच्या आर्शिवादाने मृत व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर एनओसी; कंत्राटदाराचा गोलमाल मनसेने आणला चव्हाट्यावर    

Unauthorized hoarding towers in Thane | ठाण्यात होर्डिंगचे अनधिकृत मनोरे

ठाण्यात होर्डिंगचे अनधिकृत मनोरे

Next

ठाणे, दि. २३ (प्रतिनिधी) : तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची नवी ओळख अनधिकृत होर्डिंग्जचे शहर अशी होत आहेत. ठाणे पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मृत व्यक्तींच्या नावे बेकायदेशीर एनओसी घेत उंचच उंच होर्डिंगचे मनोरे शहरात उभे राहत आहेत. कंत्राटदारांच्या साथीने सुरू असलेला हा गोलमाल मनसेने चव्हाट्यावर आणला असून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

मे- एवन इंटरप्रायजेस या कंपनीच्या ठाणे शहरातील आनंदनगरच्या परबवाडी येथील जाहिरात फलकास आपल्या परवानगी देताना कागदपत्रांची पडताळणी जाणीवपूर्वक योग्यरित्या केली नाही. या अनधिकृत जागेचे मालक महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानुसार श्रीनिवास गुडाब्बा हे आहेत. माञ मे- एवन इंटरप्रायजेस कंपनीने नाहरकत प्रमाणपत्र सादर करताना रामचंद्र सदाशिव परब आणि वामन सदाशिव परब यांचे २००३ साली निधन झालेले असताना मालकी दाखविण्यासाठी सदाशिव परब यांच्या नावे खोट्या सह्या केल्याचे समोर आले. त्यामुळे भविष्यात जागेच्या मालकी संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास महापालिकेने परवानगी देताना निष्काळजीपणा केला म्हणून पालिकेचे नाव धुळीला मिळेल. तसेच काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून महापालिकेची फसवणूक केली जात असल्याचा संशय त्यामुळे बळावत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे.

* नियमांची पायमल्ली  *
अनधिकृत मालमत्ता म्हणून महापालिकेकडे नोंद असलेल्या जागेवर अधिकृत जाहिरात फलक उभारता येत नाही. तसेच रस्त्यापासून 40 फूटपेक्षा अधिक उंचीवर संबंधित होर्डिंग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. एकीकडे ठाण्याचे महापौर अनधिकृत बांधकामांवर ताशेरे ओढत असताना त्यांच्याच प्रभागात अनधिकृत होर्डिंगचे मनोरे उभे राहत असताना अशा कामांकडे डोळेझाक होत असेल तर सर्वसामान्य माणसाने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न मनसेचे संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Unauthorized hoarding towers in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.