नागरिक पालिकेच्या कृतीबाबत अनभिज्ञ

By admin | Published: February 22, 2017 06:24 AM2017-02-22T06:24:49+5:302017-02-22T06:24:49+5:30

केडीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एमआयडीसीतील निवासी विभागात सोमवारपासून सुका

Unaware of civil action | नागरिक पालिकेच्या कृतीबाबत अनभिज्ञ

नागरिक पालिकेच्या कृतीबाबत अनभिज्ञ

Next

डोंबिवली : केडीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने एमआयडीसीतील निवासी विभागात सोमवारपासून सुका आणि ओला कचरा वेगळा संकलित करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या कृतीबाबत नागरिक अनभिज्ञ असल्याने सध्या काही ठिकाणी ओला व सुका कचरा हा एकत्रितच गोळा केला जात आहे.
सध्या एमआयडीसीत मिळणारा प्रतिसाद पाहता पुढे टप्याटप्प्याने अन्य प्रभागांमध्ये ती राबवली जाणार आहे. ओला कचरा प्लास्टीकच्या पिशवीत देऊ नये तसेच त्या कचऱ्यात एकही प्लास्टीकची पिशवी टाकू नये. प्लास्टिक विरहीत फक्त ओला कचरा सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी तर सुका कचरा स्वच्छ करूनच प्लास्टिकच्या पिशवीत गोळा करून फक्त गुरुवारी घंटागाडीला देण्यास महापालिकेने सांगितले आहे. सॅनिटरी नॅपकिन्सचे प्रत्येक पॅड कागदात गुंडाळून प्लास्टिकच्या पिशवीतून ओल्या कचऱ्याबरोबर घंडागाडीत द्यायचे आहेत.
दरम्यान, कचऱ्याच्या मुद्द्याबाबत केडीएमसीचे सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)

पालिकेने बैठक घ्यावी
च्कचरा वेगळा करण्याबाबत महापालिकेने सर्व नागरिकांना सोशल मीडियाद्वारे कळवले असले तरी स्वतंत्र बैठक घ्यायला हवी. त्यात आरोग्य विभाग हा कचरा पुढे कसा हाताळणार, त्याची विल्हेवाट कशी लावणार, याबाबत मार्गदर्शन करायला हवे, असे मत विवेक पावणसकर यांनी मांडले. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची संकल्पना चांगलीच आहे, त्याला सहकार्य केलेच पाहिजे, असे ते म्हणाले.
च्उषा पोतनीस यांनीही या उपक्रमाबाबत पालिकेने करणे प्रबोधन करणे आवश्यक आहे. आम्ही पूर्वीपासूनच ओला-सुका कचरा वेगळा करीत आहोत. परंतु, महापालिका तो एकत्रितच गोळा करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Unaware of civil action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.