वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

By admin | Published: May 23, 2017 01:22 AM2017-05-23T01:22:07+5:302017-05-23T01:22:07+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा

Unclassified waste only on the street | वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहर स्वच्छतेच्यादृष्टीने शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक केले आहे. तरीदेखील निम्याहून अधिक नागरिकांनी अद्याप कचरा वर्गीकरणाला सुरूवात केली नसल्याने त्यांचा कचराच न उचलण्याचे फर्मान पालिकेने जारी केले आहे. यामुळे वर्गीकरण न करणाऱ्यांचा कचरा दोन दिवसांपासून रस्त्यावर पसरू लागला आहे.
केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये स्वच्छतेचे सर्र्वेक्षण केल्यानंतर त्यात मीरा-भार्इंदरमधील कचरा वर्गीकरणावर ठपका ठेवण्यात आला. यामुळे स्वच्छतेतील अव्वल क्रमांकातून शहर बाहेर फेकले गेल्याने प्रशासन नाराज झाले आहे.
कचऱ्यानेच शहराचा घात केल्याचा रोष प्रशासनाने वर्गीकरणाच्या माध्यमातून थेट नागरिकांवर व्यक्त केला. यात पुरेशी जनजागृती महत्वाची ठरत असली तरी नागरिकांनीही त्याची सवय अंगवळणी पडावी, असा पारदर्शक उद्देश प्रशासनाचा आहे.
पालिकेने त्यासाठी उत्तन येथील घनकचरा प्रकल्पात वर्गीकरणाची सोय खाजगी कंत्राटदाराला उपलब्ध करून दिली आहे.
मात्र त्याची प्रक्रिया जून, जुलैमध्ये सुरू होणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून स्वच्छतेला सुरूवात करावी, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
त्यानुसार प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच नागरिकांना विविध माध्यमांद्वारे कचरा वर्गीकरणाला सुरूवात करण्याचे आवाहन केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेकांना त्याची पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अद्यापही कचऱ्याचे वर्गीकरण न करता तो एकत्रित साठविण्याची सवय कायम ठेवली आहे.
यामुळे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये खाजगी सफाई कामगारांकडून उचलण्यात येणारा कचरा वर्गीकरणाअभावी दोन दिवसांपासून तसाच ठेवला आहे. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या.
तक्ररींवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर सफाई कामागारांकडूनच दोन दिवसानंतर कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृतीला सुरूवात झाल्याचे काही संस्थांतील रहिवाशांकडून सांगितले जात आहे. परंतु अद्याप तरी त्याचा प्रत्यय आलेला दिसून येत नाही. अशी विचित्र अवस्था आहे.

Web Title: Unclassified waste only on the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.