उल्हासनगरात मामानेच केला चिमुरडीचा खून, मामाला ५ दिवसाची पोलीस कस्टडी
By सदानंद नाईक | Published: November 22, 2024 05:41 PM2024-11-22T17:41:25+5:302024-11-22T17:41:45+5:30
कंस मामाला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : गेल्या ४ दिवसापासून बेपत्ता असलेल्या सव्वा तीन वर्षाच्या चिमूरडीचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाल्यावर शेकडो नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कारवाईची मागणी केली. मात्र रात्री पोलीस चौकशीत मामा खुनी असल्याचे उघड होऊन न्यायाल्याने त्याला ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनाविली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील प्रेमनगर टेकडी परिसरात राहणाऱ्या सव्वा तीन वर्षाची अलिशा मोदी ही मुलगी घराबाहेर खेळत असताना १८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली. आई-वडील व नातेवाईकानी मुलीचा शोध घेतला. मात्र कुठेही मिळून न आल्याने, हिललाईन पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. गुरुवारी दुपारी खदान येथे अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह मिळून आल्यावर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मात्र दुसरीकडे शेकडो महिलांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कारवाईची मागणी केली. उत्तरतपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला असून शवविच्छेदना नंतर मुलीच्या मृत्युंचे कारण उघड होणार असे पोलिसांनी सांगितले.
हिललाईन पोलिसांनी तपासा दरम्यान संशय गेलेल्या मुलीच्या मामाला ताब्यात घेऊन बोलते केले असता, त्यांने खून केल्याची कबुली दिली. मुलगी अलिशा अंगणात खेळत असताना मुलीला मामा जितू नुपे याने एक थप्पड मारली, ज्यामुळे मुलगी खाली पडून मरण पावली. त्यावेळी घाबरलेला मामा नुपे यांने मुलीचा मृतदेह लपून ठेवत मतदानाच्या दिवशीं मृतदेह खदान येथे ठेवून पुरावा नष्ट करण्यासाठी उद्देशाने मृतदेह जालन्याचा प्रयत्न केला. मुलीचा मुर्तदेह शवविच्छदन करण्यासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठविल्याची माहिती पोलीस उपायुक्त गोरे यांनी दिली. तसेच अटक केलेल्या मामाला न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. स्थानिक नागरिकांनी गुरुवारी रात्री पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत कंस मामाला फाशीची देण्याची मागणी केली.