‘लॉकडाऊन’च्या नावाखाली तोतया पोलिसांनी लुबाडले एक लाख ८० हजारांचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:37 PM2021-04-05T23:37:35+5:302021-04-05T23:38:35+5:30

कळव्यातील पारसिकनगर येथून पायी जाणाऱ्या एका दाम्पत्याला ‘लॉकडाऊन है, तुम्हे मालूम नहीं है क्या?’ अशी बतावणी करीत दाम्पत्यापैकी महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडया आणि तिच्या पतीच्या गळयातील सोन्याची गोफ असा एक लाख ८० हजारांचा ऐवज फसवणूकीने लंपास केला.

Under the guise of 'lockdown', the police looted jewelery worth Rs 1 lakh 80,000 | ‘लॉकडाऊन’च्या नावाखाली तोतया पोलिसांनी लुबाडले एक लाख ८० हजारांचे दागिने

कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा

Next
ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कळव्यातील पारसिकनगर येथून पायी जाणाऱ्या एका दाम्पत्याला ‘लॉकडाऊन है, तुम्हे मालूम नहीं है क्या?’ अशी बतावणी करीत दाम्पत्यापैकी महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडया आणि तिच्या पतीच्या गळयातील सोन्याची गोफ असा एक लाख ८० हजारांचा ऐवज फसवणूकीने लंपास केला. याप्रकरणी या दाम्पत्याने रविवारी कळवा पोेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पारसिकनगर येथील रहिवाशी असलेली एक ६० वर्षीय महिला ही तिच्या पती समवेत ४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास केशव हाईटस् बिल्डींच्या दिशेने पायी जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलीवरुन ३५ ते ४० वयोगटातील दोघेजण तिथे आले. लॉकडाऊन है, तुम्हे मालूम नहीं क्या, असे बोलून दोघांपैकी एकाने यातील महिलेच्या पतीच्या गळयातील ६० हजारांचा अडीच तोळे वजनाचा सोन्याचा गोफ आणि या महिलेच्या हातातील एक लाख २० हजारांच्या चार तोळयांच्या चार सोन्याच्या बांगडया काढून घेतल्या. त्या पर्समध्ये ठेवत असल्याचे भासवून लंपास केल्या. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या दाम्पत्याने कळवा पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक यू. बी. मुंडे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Under the guise of 'lockdown', the police looted jewelery worth Rs 1 lakh 80,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.