पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:17 AM2018-08-29T04:17:27+5:302018-08-29T04:18:15+5:30

जि.प.चा गौरव : भिवंडी, कल्याण सर्वोत्तम

Under the Prime Minister's Housing Scheme, Thane district first in the state | पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

पंतप्रधान आवास योजनेत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम

Next

ठाणे : केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी म्हणून असलेली प्रधानमंत्री आवास योजनेत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाने राज्यात प्रथम क्र मांक मिळवला आहे. तर राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पहिल्या दोन तालुक्यांमध्ये कल्याण आणि भिवंडी या तालुक्यांचा समावेश आहे.

मोठ्या संख्येने घरकुले पूर्ण करणाºया राज्यातील पहिल्या दहा तालुक्यांमध्ये शहापूर तालुक्याने प्रथम क्र मांक प्राप्त केला आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्याने अव्वल क्रमांक मिळवला. यामुळे १ सप्टेंबर रोजी सिडको भवन, सभागृहामध्ये राज्याचे ग्राम विकास सचिव असीम गुप्ता यांच्या हस्ते ठाणे जिल्हा परिषदेचा गौरव होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील या कामिगरीची दखल घेऊन घरकुल राज्य व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा हा गौरव ग्रामविकास सचिवांच्या हस्ते पार पडणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाºया शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाच्या माध्यमातून या योजना राबवल्या जात आहेत.
या योजने अंतर्गत २०१६-१७ वर्षा करिता जिल्ह्याला तीन हजार ३९९ लक्षांक दिले होते. त्यापैकी तीन हजार १४६ पूर्ण केले. तर २०१७ - १८ करीता ७७४ एवढे लक्षांक दिले होते. त्यापैकी ५२१ घरकुल बांधली. २०१८ - १९ करीता दिलेल्या ४६२ लक्षांकापैकी ४४३ घरांना मंजुरी मिळाली असून पहिला हप्ताही दिल्याचा दावा आहे.

शासकीय यंत्रणा सज्ज

च्प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद असून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्वच यंत्रणा तत्परतेने काम करत आहेत.
च्२०१७ -१८ वर्षाचा संपूर्ण लक्षांक आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सगळ्या यंत्रणा सज्ज असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.
521
घरकूल पूर्ण

443
घरांना मंजुरी

Web Title: Under the Prime Minister's Housing Scheme, Thane district first in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.