प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार!

By अजित मांडके | Published: December 14, 2023 03:13 PM2023-12-14T15:13:24+5:302023-12-14T15:13:41+5:30

क्रिसीलमार्फत सादर केलेल्या व्यावसायिक, व्यवहार्यता अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. 

Under the Pradhan Mantri Awas Yojana, 'Affordable Houses' will be implemented in Betwade! | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार!

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार!

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' ही योजना राबविण्यात येत असून ही योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी महापालिकेकडून वास्तुविशारद, पी.पी.पी एक्सपर्ट व ट्रान्झॅक्शन ॲडव्हायझरी म्हणून 'क्रिसील' या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेकडून या प्रकल्पाचा व्यावसायिक व्यवहार्यता अहवाल सादर केल्यानंतर निविदा प्रक्रिया करुन ही योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी आढावा बैठक घेवून माहिती घेतली. क्रिसीलमार्फत सादर केलेल्या व्यावसायिक, व्यवहार्यता अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. 

बेतवडे येथे शासनाकडून प्राप्त झालेल्या दोन्ही भूखंडावर प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत 'परवडणारी घरे' या शीर्षकाखाली आर्थिक दुर्बल घटकातंर्गत येणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रात सुमारे १४४१  लाभार्थी आहेत पैकी १२५३ लाभार्थ्यांना परवडणारी घरे अल्पदरात उपलब्ध होणार असून उर्वरित १८८ प्रकल्पबाधितांना रुपये दोन लक्ष इतका आर्थिक हिस्सा अदा करुन सदनिका देय राहतील. सदर सदनिका ३० चौ.मी चटईक्षेत्र इतक्या मोजमापाच्या असतील. सदरची कामाची निविदा पी.पी.पी. तत्वावर काढण्यात येणार असून जो निविदाकार १४४१ सदनिकांपेक्षा अधिक सदनिका (पाच वर्षाच्या देखभाल व दुरूस्तीसह) त्याचे स्वखर्चाने महापालिकेस बांधून देईल अशा विकासकासाची नियुक्ती करण्यात येईल, यामध्ये सदर विकासकास उर्वरित चटईक्षेत्रामध्ये नियमानुसार सदनिका व गाळे तयार करुन व्यावसायिक विक्री करण्याची मुभा राहिल असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.  

'परवडणारी घरे' या योजनेतंर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांना केंद्रशासनामार्फत प्रति सदनिका रुपये दीड लाख तर राज्यशासनामार्फत रुपये १ लाख याप्रमाणे अनुदान प्राप्त होणार आहे. या बैठकीमध्ये क्रिसीलमार्फत या योजनेचा सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आला. या अनुषंगाने संबंधित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, विकासक नियुक्त करणे आदी कामे जलदगतीने पूर्ण करुन १५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रत्यक्षात या कामास सुरूवात होण्याच्या दृष्टीकोनातून सुनिश्चित नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना बांगर यांनी दिल्या.

Web Title: Under the Pradhan Mantri Awas Yojana, 'Affordable Houses' will be implemented in Betwade!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे