ठाण्यातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांना अंडरवल्र्डकडून धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 10:26 PM2021-06-02T22:26:24+5:302021-06-02T22:30:14+5:30

ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण यांना अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठविल्यामुळेच ही धमकी आली असून ज्याठिकाणी धमकी देण्यात आली त्या ठिकाणी ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हेही स्वत: उपस्थित होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

Underworld threat to Vikrant Chavan? | ठाण्यातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांना अंडरवल्र्डकडून धमकी?

अनधिकृत बांधकामाबाबत आवाज उठविल्यामुळे धमकी दिल्याचा चव्हाण यांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देअनधिकृत बांधकामाबाबत आवाज उठविल्यामुळे धमकी दिल्याचा चव्हाण यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि ठामपा गटनेते विक्र ांत चव्हाण यांना अंडरवर्ल्डकडून धमकी दिल्याचा आरोप त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. अनधिकृत बांधकामांबाबत आवाज उठविल्यामुळेच ही धमकी आली असून ज्याठिकाणी धमकी देण्यात आली त्या ठिकाणी ठामपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हेही स्वत: उपस्थित होते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी पोलीस आयुक्त तसेच पालिका आयुक्तांची भेट घेऊन आहेर यांच्या चौकशीची मागणी केली असून दोन दिवसांत अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली नाही तर पालिका मुख्यालयाच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
ठाणे महापालिका हद्दीत सध्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चव्हाण यांनी या प्रश्नावर सभागृहातही आवाज उठविला होता. ठाण्याच्या पलीकडे देखील मोठया प्रमाणात बांधकामे सुरु असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी समाज माध्यमांमध्ये अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याची त्यांनी दिली आहे. चव्हाण हे घाटकोपरमधील एका कार्यालयात बसले होते. या कार्यालयात सहाय्यक आयुक्त आहेर देखील उपस्थित होते, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. आपल्याला तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या व्यक्तीला फोन जोडून देण्यात आला. संबंधित व्यक्तीने आपल्याशी चर्चा केली. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाकडे लक्ष घालू नका, अन्यथा तुमचा अभिमन्यू करण्यात येईल अशी धमकी यावेळी देण्यात आली. अशा धमक्या देण्यात येत असल्याने याविरोधात आपण कायदेशीर पाऊल उचलत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Web Title: Underworld threat to Vikrant Chavan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.