अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत
By admin | Published: October 26, 2015 12:47 AM2015-10-26T00:47:41+5:302015-10-26T00:47:41+5:30
आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रविवारी अचानक आलेल्या पावसाने थोडा दिलासा दिला. ठाणे शहर परिसरात तुरळक ठिकाणी पडलेला
ठाणे : आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रविवारी अचानक आलेल्या पावसाने थोडा दिलासा दिला. ठाणे शहर परिसरात तुरळक ठिकाणी पडलेला हा पाऊस कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथे मात्र जोरदार बरसला. या पावसामुळे कापलेल्या हळव्या भाताचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये एकूण लागवडीपैकी सुमारे ३५ टक्के हळव्या भाताची लागवड झाली आहे. आता त्याच्या कापणीचे काम जिल्ह्यात जोरदारपणे सुरू आहे. बहुतांशी कापलेला भात वाळण्यासाठी शेतात पडून आहे. त्यातच आता हा अवकाळी पाऊस पडला. या पावसाचे प्रमाण वाढल्यास या हळव्या भाताच्या नुकसानीची शक्यता शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
>>आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे संपूर्ण कल्याण ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. दुपारी ४ नंतर ओल्या वादळी पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील पांजरापोळ, रायता, गोवेली, टिटवाळा या ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रायता, पांजरापोळ, ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे विजेच्या खांबांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. रुग्ण वाहिकेवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.