समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनातील फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांचेठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 05:52 PM2018-12-03T17:52:05+5:302018-12-03T17:58:37+5:30
जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली.
ठाणे : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्यां जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाजकार्यकर्त्यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला आहे.
शेतकरख़यांची फसवणूक झाल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही. मात्र संंबंधीत अधिकाऱ्यांच्या दलालांकडून मानिसक, शारीरिक आणि अर्थीक छळूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संबंधीत शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यचे या उपोषणकर्त्यांमधील भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरी देखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे ढमणे यांनी सांगितले.
समृध्दी मार्गाने बाधीत झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराड पाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कमुनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांचा नातेवाईकांचे सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रने मार्फत चौकशी करण्यात यावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखत प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणी देखील या उपोषणाच्या माध्यमातून जोरधरू लागली आहे.