आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:07 PM2019-06-06T22:07:01+5:302019-06-06T22:09:41+5:30

भिवंडी : रमजान ईद निमीत्ताने शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

The unfortunate death of a nine-year-old girl after falling in the sky | आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देमुस्कानचा तोल गेल्यानंतर ती पाळण्यातून पडून जखमीरमजान ईद निमीत्ताने खेळण्याच्या जत्रेत गेली मुस्कानपाळण्याच्या चालकाच्या हलगर्जीपणाने झाला घात

भिवंडी : रमजान ईद निमीत्ताने शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाश पाळण्यातून पडून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने तीच्या कुटूंबासह परिसरांत ईदच्या सणांतच शोककळा पसरली.
मुस्कान मोहम्मद शमीम सिध्दीकी (९) असे मयत मुलीचे नांव असून ती काप तलाव जैतूनपुरा या भागात आपल्या आईवडीलांसोबत रहात होती. मुस्लिम बांधवांमध्ये रमजान ईद हा सण दिवाळीप्रमाणे साजरा करतात. त्यामुळे लहान मुलांची चंगळ असते. ईदच्या निमीत्ताने घरी आलेले पाहूणे,नातेवाईक यांच्यासह आईवडील देखील आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे(ईदी)देतात. या पैश्यांतून हौसमौज करण्यासाठी सायंकाळी मुले घराबाहेर पडतात.त्याप्रमाणे काल बुधवार रोजी रमजान ईदच्या निमीत्ताने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जैतूनपुरा कापतलाव येथील मुस्कान ही नऊ वर्षाची मुलगी आपल्या चुलत बहिणीसोबत समदनगर येथील भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत गेली. तेथे हाताने फिरविल्या जाणाऱ्या छोट्या आकाश पाळण्यात ती बसल्यानंतर पाळणा फिरताना तो वर गेला .त्यामुळे घाबरून तीचा तोल जाऊन ती खाली पडली. ती वरून खाली पडत असताना पाळण्याच्या खांबावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात ती पडली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालविणाºया चालकाने तीला पाळण्याजवळ जमीनीवर ठेऊन तेथुन पलायन केले.
या घटनेची माहिती तेथील मुलांनी मुस्कानच्या घरी दिल्यानंतर तीच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मुस्कानला स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तीचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगीतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हाताने आकाश पाळणा फिरविणाºया चालकाने खबरदारी घेत तात्काळ पाळणा थांबवून मुलीला वैद्यकीय मदत दिली असता तर आपली मुलगी बचावली असती. पाळणा चालकाच्या हलगर्जीपणामुळे तीचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिध्दीकी यांनी केला आहे.
हाताने धक्का देत चालविल्या जाणाºया आकाश पाळण्यास धक्का देण्यासाठी पाळणा चालक वरती चढून पाळण्यास लटकत खाली येत पुन्हा वर चढून पाळण्यास लटकत जोरात धक्का देत होता. हे करीत असताना पाळण्यात बसलेली मुस्कान हिचे डोके लोखंडी खांबावर आदळत ते पाळण्यात अटकल्याने ती जखमी होऊन तिचा डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. पाळणा चालकाने तिला जखमी अवस्थेत खाली उतरवून तेथेच मातीत झोपवून त्याने पलायन केले,अशी माहिती प्रत्यक्षदर्शी महेफुज अन्सारी व रूबिना या मुलांनी सांगितली आहे .

Web Title: The unfortunate death of a nine-year-old girl after falling in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.