शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

By सुरेश लोखंडे | Published: March 18, 2023 01:25 PM2023-03-18T13:25:29+5:302023-03-18T13:26:18+5:30

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Unfortunate death of a farmer in Shetkar Morcha; Incident near Wasind | शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

googlenewsNext

ठाणे - कांद्याला व शेती मालाला हमी भाव मिळवण्यासाठी नाशिक येथून मंत्रालयावर काढलेला किसान सभेच्या लॉंग मार्च हा शेतकऱ्यांचा मोर्चा २ दिवसापासून शहापूर तालुक्यातील वाशिंदमध्ये आडवण्यात आलेला आहे.  या शेतकऱ्यांमधील पुंडलिक आंबो जाधव (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री  दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले आहे. या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य शासनाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मोर्चेकरांची घटनास्थळी भेट घेतली. मोर्चा मागे घेतल्याने आता सर्व शेतकरी रेल्वेने घरी जायला निघाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

या मोर्चातील दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेत ले. त्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन दिले. यास अनुसरून हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्च मोर्चा चा आजचा सातवा दिवस आहे. मुंबई, ठाण्यात आगमन होण्यापूर्वी हा मोर्चा शहापूरच्या वासिंद येथील मैदानावर दोन दिवसांपासून थांबवून ठेवलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थ संक्लपीय अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडकण्यासाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या मुंबई,ठाणे महानगरातील वाहतुकीस अन्यही जनजीवनावर हा हजारो शेतकर्यांचा मोर्चा परिणाम करणारा ठरत असल्यामुळे त्यास वासिंद येथे अडवण्यात आले होते. पण या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे या मोर्चातील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे या शेतकर्यांचे नेते उमेश देशमुख यांनी स्पष्ट केले. या मोर्चातील शेतकर्यांना घरी पोहोच करण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था केली जात असल्याची चर्चा आहे.पण शेतकर्यांनी रेल्वेचे तिकीट घेऊन ते घरी जायला निघाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Web Title: Unfortunate death of a farmer in Shetkar Morcha; Incident near Wasind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.