भिवंडीत तलावात पोहण्यास गेलेल्या दोघा लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू
By नितीन पंडित | Published: February 7, 2023 05:51 PM2023-02-07T17:51:58+5:302023-02-07T17:52:40+5:30
भिवंडी तालुक्यातील सावंदे गावातील तलावात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे .
भिवंडी-भिवंडी तालुक्यातील सावंदे गावातील तलावात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे .
भिवंडी शहरा नजीक असलेल्या गोरसई या गावातील चाळीत राहणारे सिमरान इम्रान खान वय १२ व धीरज सुरज मिस्त्री वय ८ हे दोघे ४ फेब्रुवारी सायंकाळ पासून खेळायला गेले होते.रात्र झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेऊन ही ते आढळून आले नाहीत.त्यानंतर रात्री उशिरा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची खबर दिली.
दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञाता विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवून शोध घेण्यास सुरुवात केली.पोलिसांसह स्थानिक पोलीस पाटील व जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण परिसर पिंजून काढला.निर्जन स्थळ,संडास टाक्या, पाण्याच्या टाक्या या ठिकाणी सतत दोन दिवस शोध घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती साईनाथ पाटील यांनी दिली.त्यानंतर सोमवारी दुपारी तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना तलावाकाठी या मुलांचे मृतदेह तरंगताना आढळून आले.तालुका पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना साठी शासकीय रुग्णालयात पाठवून या घटनेची अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.या घटने नंतर गोरसई परिसरात शोककळा पसरली आहे .