ठाण्यात मासुंदा तलावामध्ये अनोळखी तरुणीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:09 IST2021-04-14T20:05:46+5:302021-04-14T20:09:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मासुंदा तलावामध्ये एका २५ वर्षीय अनोळखी तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या ...

ओळख पटविण्याचे काम सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मासुंदा तलावामध्ये एका २५ वर्षीय अनोळखी तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
विसावा हॉटेल समोरील मासुंदा तलाव परिसरात या तरुणीचा मृतदेह मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आढळला. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दल आणि नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. उंची पाच फूट, चेहरा गोल, गहूवर्णीय, सरळ नाक , दोन्ही हातांवर मेहंदी काढल्याच्या खुणा तसेच अंगामध्ये गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पिवळसर रंगाची सलवार आहे. या वर्णनाच्या तरुणीबाबत कोणालाही माहिती असल्यास तिच्या नातेवाईकांनी नौपाडा पोलिसांशी ०२२-२५४४४४३३ किंवा ०२२-२५४२३३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी केले आहे. या तरुणीची ओळख पटविल्यानंतरच तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकेल, असे नौपाडा पोलिसांनी सांगितले.