देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव होणार भिवंडीत - कपिल पाटील 

By नितीन पंडित | Published: March 9, 2023 06:46 PM2023-03-09T18:46:22+5:302023-03-09T18:47:19+5:30

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत होणार असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. 

 Union Minister Kapil Patil said that the country's first carbon neutral tribal village will be built in Bhiwandi  | देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव होणार भिवंडीत - कपिल पाटील 

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव होणार भिवंडीत - कपिल पाटील 

googlenewsNext

भिवंडी : भारतातील पहिले आदिवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले असून पहिले आदिवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याची माहिती पाटील यांच्या कार्यालयाकडून गुरुवारी देण्यात आली आहे.

जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौर ऊर्जेचा वापर केला जात असून, ग्रामपंचायतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत. या गावात ५०० किलोवॅटचा सोलर प्लांट बसविला आहे. त्याच धर्तीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन आदिवासी गावे व १३ ग्रामपंचायती कार्बन न्यूट्रल करण्याचा निर्धार केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. त्यानुसार या संदर्भात आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

बचतगटाच्या कार्यशाळा व सरस प्रदर्शनाच्या उद्घाटनानिमित्ताने ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अंजुरदिवे येथे बैठक घेतली. या बैठकीत प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचीही उपस्थिती होती. या गावांच्या आराखड्याबद्दल ₹ गिरीराज सिंह यांनी समाधान व्यक्त करून काही सुचना केल्या असून या प्रकल्पासाठी निधी देण्याचे जाहीर केले असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील दुधनी व अखिवली वाफे या आदिवासी गावांबरोबरच, भिवंडी तालुक्यातील सोनाळे, रांजणोली, अंजुर, दिवे अंजुर, काल्हेर, कशेळी, कोपर, पुर्णा, दापोडे, राहनाळ, वळ, माणकोली, ओवळी आदी गावे कार्बन न्यूट्रल गावे करण्याचा आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पात प्रत्येक घराला अत्यल्प किंमतीत वीज उपलब्ध होणार घरांमध्ये सौरचुली, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गावात सोकपीट, सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

 

Web Title:  Union Minister Kapil Patil said that the country's first carbon neutral tribal village will be built in Bhiwandi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.