मास्क न वापरल्याने केंद्रीय मंत्र्यांचा चालक सोशल मीडियावर ट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:46 AM2021-08-20T04:46:43+5:302021-08-20T04:46:43+5:30

कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यासंदर्भात कपिल पाटील यांना विचारले असता, त्यांनी ...

Union minister's driver trolls on social media for not wearing mask | मास्क न वापरल्याने केंद्रीय मंत्र्यांचा चालक सोशल मीडियावर ट्रोल

मास्क न वापरल्याने केंद्रीय मंत्र्यांचा चालक सोशल मीडियावर ट्रोल

Next

कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. यासंदर्भात कपिल पाटील यांना विचारले असता, त्यांनी आपण सर्व नियम पाळले असल्याचे स्पष्ट केले. जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मास्क वापरत नाहीत, त्यांच्यासोबत आपण फोटोदेखील काढला नाही, असा दावा त्यांनी केला. ज्या वेळी कपिल पाटील हा दावा करीत माध्यमांशी बोलत होते, त्याचवेळी त्यांच्या चालकाने कोणतीच सुरक्षा साधने वापरली नव्हती. साधा मास्कदेखील त्याच्या नाकातोंडावर नव्हता. कपिल पाटील यांनी स्वतःच्या चालकावर ही बंधने का लादली नाहीत, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे, अंबरनाथमध्ये भाजप शहराध्यक्ष यांच्या वतीने कपिल पाटील यांचे स्वागत केले जात असताना कपिल पाटील यांनी अंबरनाथ पश्चिमचे शहराध्यक्ष राजेश कवठाळे यांना मास्क वापरण्यास सांगितले होते. मास्क न वापरल्याने कपिल पाटील यांनी शहराध्यक्षाला आपल्या भाजपच्या मफलरचा मास्क करण्याचा सल्लादेखील दिला. शहराध्यक्षाने मास्क लावल्यानंतर त्याच्यासोबत पाटील यांनी फोटो काढला आणि त्यांचा सत्कार स्वीकारला.

--------------------

Web Title: Union minister's driver trolls on social media for not wearing mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.