शासनाने ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ अधिकृतरित्या जाहीर करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याना पदाधिकाऱ्यांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 07:53 PM2020-02-20T19:53:02+5:302020-02-20T19:57:25+5:30
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ठरवल्याप्रमाणे ‘१५आॅक्टोबर हा पेपर विक्रेता दिन’ देशभरात साजरा होत आहे. या वृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने अधिकृत जाहीर करावा अशी मागणी या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून या पदाधिकाºयांनी नवी दिल्ली येथे जावडेकरांनी भेट घेऊन मागणी लावून धरली.
ठाणे :‘१५ आॅक्टोबर’ हा दिवस वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून २०१८ पासून देशभर साजरा केला जात आहे. शासनाने या दिनाला अधिकृतरित्या मान्यता द्यावी,या मागणीसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट आॅल इंडिया न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे अध्यक्ष बब्बर सिंग चव्हाण, मुनिश अहमद, पिंटू रावल, ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे आदींनी घेऊन त्यांना साकडे घातले आहे.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ठरवल्याप्रमाणे ‘१५आॅक्टोबर हा पेपर विक्रेता दिन’ देशभरात साजरा होत आहे. या वृत्तपत्र विक्रेता दिन शासनाने अधिकृत जाहीर करावा अशी मागणी या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जावडेकर यांच्याकडे केली. आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून या पदाधिकाºयांनी नवी दिल्ली येथे जावडेकरांनी भेट घेऊन मागणी लावून धरली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वारंवार मागणी करूनही शासनाकडून अध्याप या वृत्तपत्र विक्रेता दिनास मान्यता दिली नसल्याची खंतही त्यांच्याकडे व्यक्त केली. यास अनुसरून ‘आपण सर्व विक्रेते लोकांपर्यत वृत्तपत्र पोहोचवण्याचे अत्यंत मोलाचे काम करत आहात आणि आपल्या पाठीशी सरकार आहे. यामुळे याविषयी लवकरच निर्णय घेऊ’ असे आश्वासनही त्यांनी दिल्याचे घाडगे यांनी सांगितले.
.............