केंद्रीय ग्रामविकास मंत्री २५ आॅगस्टला शहापूरच्या दुर्गम भागातील विहिगांवला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:54 PM2018-08-04T19:54:41+5:302018-08-04T20:03:56+5:30
सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता हे गाव जगाच्या संपर्कात आले आहे.
ठाणे : सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शहापूर तालुक्यातील विहिगाव दत्तक घेतले आहे. एक हजार ८५० लोकवस्तीच्या या गावास केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर, तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील २५ आॅगस्टला भेट देणार आहेत. तत्पूर्वी या गावातील सोयीसुविधांसह विविध स्वरूपांच्या विकासकामांचा आढावा सहस्रबुद्धे यांनी जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी घेतला.
सांसद आदर्श गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या विहिगाव या अतिदुर्गम भागातील व डोंगरपठारावरील गावाची निवड सहस्रबुद्धे यांनी केली आहे. या नॉटरिचेबल गावास रिचेबल करण्यासाठी खासदार निधीतून बीएसएनएलचे टॉवर त्यांनी उभारले आहे. आता हे गाव जगाच्या संपर्कात आले आहे. याप्रमाणेच या गावाच्या ग्रामविकास आराखड्यात मंजूर असलेल्या ६८ कामांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासमवेत त्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी सादरीकरण करून क्षेत्रनिहाय विविध कामांच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. प्रस्तावित आराखड्यातील सुमारे ६० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे २० आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.
गावातील विकासकामांच्या समारोपाचा कार्यक्रम येत्या २५ आॅगस्ट रोजी होणार आहे. त्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तसेच राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर तसेच शहापूरचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, जिल्ह्यातील विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
एक हजार ८५० लोकवस्तीच्या या गावास