केंद्रीय सचिव यांची उंबरखांड ग्रामपंचायतला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:19 PM2020-12-17T19:19:30+5:302020-12-17T19:19:37+5:30

15 वित्त आयोगाबाबत मार्गदर्शन आणि  चर्चाही त्यांनी केली. 

Union Secretary visits Umbarkhand Gram Panchayat | केंद्रीय सचिव यांची उंबरखांड ग्रामपंचायतला भेट

केंद्रीय सचिव यांची उंबरखांड ग्रामपंचायतला भेट

Next

ठाणे: शहापूर तालुक्यातील  ग्रामपंचायत उंबरखांड येथे केंद्रीय अप्पर सचिव अरुण बरोका यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पाहणी करीत असतांना शौचालय बांधकाम व वापर, जल जीवन मिशन माहिती, पाणी पुरवठा योजना, रस्ते, शाळा, अंगणवाडी, याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी 15 वित्त आयोगाबाबत मार्गदर्शन आणि  चर्चाही त्यांनी केली. 

यावेळी अभय महाजन, सहसचिव पाणी पुरवठा व स्वछता विभाग मंत्रालय,  राहुल साकोरे प्रकल्प संचालक पाणी पुरवठा व स्वछता विभाग  भाऊसाहेब दांगडे  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, छायादेवी शिसोदे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा उप मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे   हरीसिंग भस्मे कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद ठाणे   गणेश वाडेकर राज्यसमन्व्यक  पाणी पुरवठा व स्वछता विभाग आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या  सरपंच  सुनीता धुपारे, उपसरपंच दीपक  निमसे, ग्रामसेवक  हेमंत वेखंडे  स्वच्छ भारत मिशन जिल्हा टीम त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Union Secretary visits Umbarkhand Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे