भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोदी सरकार विरोधात अनोखे एप्रिल फुल आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 10:39 PM2023-04-01T22:39:20+5:302023-04-01T22:39:55+5:30
वाढती बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप व केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या.
भिवंडी - भाजप सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना विकासाच्या नावाने खऱ्या अर्थाने एप्रिल फुल केले असल्याचा आरोप करत भिवंडीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस म्हणून शनिवारी साजरा केला. कल्याण नाका परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित झा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारचा निषेध करत सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. वाढती बेरोजगारी, महागाई आदी मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी यावेळी भाजप व केंद्र सरकार विरोधी घोषणा दिल्या.
मोदी विकास म्हणजे फसवा विकास म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस आज साजरा करुन एक प्रतिकात्मक आंदोलन करन्यात आला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजित झा यांनी यावेळी दिली आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भिवंडी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफ खान, कार्याध्यक्ष हारून खान यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.