भिवंडीत साजरा झाला अनोखा वाढदिवस; लाडक्या श्वानाच्या वाढदिवसाला केले ७५ नागरिकांनी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 11:28 PM2022-04-18T23:28:54+5:302022-04-18T23:29:00+5:30

- नितिन पंडीत लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : राष्ट्रीय  पुरुष,नेते,अभिनेत्यांसह प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन आजपर्यंत ...

Unique birthday celebrated in Bhiwandi; 75 citizens donated blood on the birthday of a pet dog | भिवंडीत साजरा झाला अनोखा वाढदिवस; लाडक्या श्वानाच्या वाढदिवसाला केले ७५ नागरिकांनी रक्तदान

भिवंडीत साजरा झाला अनोखा वाढदिवस; लाडक्या श्वानाच्या वाढदिवसाला केले ७५ नागरिकांनी रक्तदान

googlenewsNext

- नितिन पंडीत

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : राष्ट्रीय  पुरुष,नेते,अभिनेत्यांसह प्रसिद्ध व्यक्तींचा वाढदिवस अथवा जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन आजपर्यंत केल्याचे पाहिले आहे.मात्र आपल्या लाडक्या पाळीव श्वानाच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांसह चक्क रक्तदान शिबीराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम भिवंडीत रविवारी झाले आहे.

 'पोट्स' नावाच्या या पाळीव श्वानाचा वाढदिवस एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या थाटात रक्तदान करून साजरा  करण्यात आला. याशिवाय केक कापून व आशीर्वाद घेऊन   वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकीतुन पहिल्यादांच श्वानाच्या वाढदिवसाला रक्तदान करून  अनोख्या पद्धतीने  वाढदिवस साजरा  करण्यात  आला  आहे. यावेळी सुमारे ७५ नागरिकांनी रक्तदान केले आहे. 

 भिवंडी शहरातील ज्ञानराजा जनकल्याण संस्था आणि मी भिवंडीकर , संकल्प रक्तदानाचा यांच्या संयुक्त संकल्पनेतु हा वाढदिवस साजरा करण्यात आला. भिवंडीतील मोहन पठाडे हे गेल्या तीन वर्षांपासून पाग जातीच्या श्वानाचे पालन-पोषण करतात. त्याचे नाव त्यांनी 'पोट्स' असे ठेवले असून त्याला तीन वर्षांपूर्वी पठाडे यांच्या एका मैत्रणीने गिफ्ट स्वरूपात दिले होते. तेव्हापासून जीवापाड प्रेम करत घराच्या  सदस्यासारखी ते या श्वानाची देखभाल करतात.'पोट्स'च्या   वाढदिवसाचे औचित्य साधून मोहन पठाडे यांनी भिवंडीतील  पार्वती मंगल कार्यलयात वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मोठे फ्लेक्स देखील लावले होते. यावेळी 'पोट्स'वर प्रेम करणाऱ्या  बहुतांश तरुणांनी त्याला आशीर्वाद देऊन रक्तदान केले आहे. 'पोट्स' तीन वर्षाचा झाल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी खास  कार्यक्रमही साजरा करण्यात आला. यामध्ये 'पोट्स'चे  औक्षण करून ओवाळण्यात आले, आणि घरच्या सदस्यांसह कॉग्रेसचे नगरसवेक प्रशांत लाड, साई संस्थांच्या डॉ. स्वाती खान यांच्या हस्ते केक कापून आनंद साजरा करण्यात आला. 'पोट्स'च्या अशा अनोख्या वाढदिवसाची चर्चा भिवंडी शहरात पसरली  आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या वाढ दिवसामध्ये लॉकडाऊन होता. त्यावेळी गरीब गरजूना अन्नधान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे पठाडे यांनी सांगितले. 

Web Title: Unique birthday celebrated in Bhiwandi; 75 citizens donated blood on the birthday of a pet dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.