कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 03:39 PM2021-05-24T15:39:24+5:302021-05-24T15:40:44+5:30

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील सहाशे सफाई कर्मचार्‍यांना केले वाटप

Unique initiative of Thane MNS Given 'Amaras-puri to Corona warrior | कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम

कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना 'आमरस - पुरीची' मेजवानी; ठाणे मनविसेचा अनोखा उपक्रम

Next

ठाणे : कोरोनाच्या लाटेत शहराला स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवणार्‍या सफाई कर्मचार्‍यांचे आज ठाण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तोंड गोड केले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील विविध भागात साफसफाई करणार्‍या या सहाशेपेक्षा अधिक कोरोना योध्दा, स्वच्छतादूतांना मनविसे पदाधिकार्‍यांनी 'आमरस  पुरीचे' वाटप केले असून त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

सरकार दरबारी असो अथवा सामाजिक जीवनात नेहमी उपेक्षा पदरी पडणार्‍या सफाई कर्मचार्‍यांकडे कोणत्याच घटकाचे लक्ष जात नाही. माञ कोरोना काळात सफाई कर्मचार्‍यांनी शहराच्या स्वच्छतेचे काम उत्तमरित्या पुर्ण केले. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शहरातील सहाशेपेक्षा अधिक सफाई कर्मचार्‍यांना आज आमरस पुरीचे वाटप केले. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मनविसे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनातून सफाई कर्मचार्‍यांना आमरस पुरीचे वाटप करण्यात आले. शहरातील मानपाडा, रामनगर, दिवा, वर्तकनगर, रामचंद्र नगर, बाटा कंपाऊंड भागात सफाई कर्मचार्‍यांना आमरस - पुरीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप चव्हाण, प्रमोद पत्ताडे, मयूर तळेकर, राकेश आंग्रे, अमोल राणे, कुशल पाटील, निलेश वैती, विवेक भंडारे, सागर वर्तक, प्रसाद होडे, कुणाल मयेकर, अरूण उंबरकर यांनी प्रयत्न केले.

Web Title: Unique initiative of Thane MNS Given 'Amaras-puri to Corona warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.